एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षण प्रशिक्षण

363

एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षण प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित राहणेबाबत………

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ( बालभारती ) मार्फत इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी तसेच ४८८ आदर्श शाळामधील इयत्ता दुसरीच्या वर्गासाठी एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय व शासकीय अनुदानित मराठी व उर्दू माध्यमांच्याशाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेमार्फत दिनांक १७ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२२ रोजी सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आले आहे.

तरी सदर प्रशिक्षण वर्गासाठी आपल्या जिल्ह्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या शासकीय व शासकीय अनुदानित सर्व शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना (फक्त मराठी माध्यम) आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील कार्यरत आदर्श शाळा संपर्क अधिकाऱ्यांना उपरोक्त नमूद कालावधीत उपस्थित राहण्यासाठी अवगत करण्यात यावे.. सदर ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण तपशील आणि यूट्युबची लिंक खालीलप्रमाणे आहे.

दिनांक- 17/8/2022 वेळ-10:00 ते 12:50

इयत्ता १ ली मराठी माध्यम

दिनांक 18/8/2022 वेळ-10:30 ते 3:30

इयत्ता १ ली मराठी माध्यम

शुक्रवार दिनांक- 17/8/2022 वेळ-10:00 ते 12:50

इयत्ता १ ली उर्दू मध्यम

दिनांक 18/8/2022 वेळ-10:30 ते 3:30

इयत्ता १ ली उर्दू मध्यम

दिनांक- 17/8/2022 वेळ-1:20 ते 4:50

इयत्ता २ री मराठी माध्यम (फक्त आदर्श शाळा)

दिनांक 18/8/2022 वेळ-1:50 ते 6:15

इयत्ता २ री मराठी माध्यम (फक्त आदर्श शाळा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here