महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम क्र. १६ (१८) (अ) नुसार एखादा स्थायी कर्मचारी मोठया सुट्यांचा हक्कदार असुनही एखद्या वर्षात पूर्ण मोठया सुट्यांचा किंवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिवर्षी झालेला असेल तर त्याबद्दल त्याला पूर्ण सुट्टीशी त्याने सुट्टीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक ३० दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्येएवढी अर्जित रजा अनुज्ञेय होईल.
ज्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी २१ दिवसाचे वरिष्ठ / निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण (गृहपाठासह) पूर्ण केल्यामुळे त्यांना सुट्टी उपभोगण्यास प्रतिबंध झाला असेल त्यांच्या खाती १० दिवसाची अर्जित रजा जमा करावी. तशी नोंद संबंधितांच्या सेवा पुस्तकात करावी.