१. वरच्या संवर्गात पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर अथवा तत्पूर्वीच एखाद्या कर्मचाऱ्याने पदोन्नतीचे पद स्विकारण्यास नकार दर्शविल्यास, त्याचे नांव पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या निवडयादीतून काढून टाकण्यात यावे व पुढील दोन वर्षी होणाऱ्या निवडसूच्यांमध्ये संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याच्या नावाचा विचार न करता तिसऱ्या वर्षाच्या निवडसूचीत संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याची पदोन्नतीसाठीची पात्रता तपासण्यात यावी. त्यावेळेच्या गुणवत्तेप्रमाणे संबंधित अधिकारी / कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरल्यास त्याचा नियमित निवडसूचीत समावेश करण्यात यावा.(उदा. सन २०१५ च्या निवडसूचीकरिता (दि.१.०९.२०१४ ते दि.३१.०८.२०१५) दि.१५.०१.२०१५ रोजी झालेल्या निवडसूचीत एखाद्या अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला असेल व त्यांनी पदोन्नतीस नकार दिल्यास त्यांचे नाव २०१५ च्या निवडसूचीतून वगळून त्यांचा सन २०१६ व सन २०१७ च्या निवडसूचीकरिता देखील विचार न करता सन २०१८ च्या निवडसूचीकरिता विचार करण्यात यावा. )
२. ज्या अधिकारी / कर्मचाऱ्याने कायमस्वरुपी पदोन्नती नाकारलेली आहे, कोणत्याही निवडसूचीकरिता विचार करण्यात येऊ नये.
३. ज्या अधिकारी / कर्मचारी यांचा पहिल्या वेळेस पदोन्नती नाकारल्यानंतर ३ वर्षानंतर दुसऱ्या वेळेस निवडसूचीकरीता विचार करण्यात आल्यानंतर व संबंधित अधिकारी/कर्मचारी पदोन्नतीस पात्र ठरल्यास मात्र संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याने पुन्हा पदोन्नतीस नकार दिल्यास त्यांचा त्या निवडसूचीत व पुढील दोन वर्षांच्या निवडसूचीत विचार करण्यात येणार नाही. याप्रमाणे पुढील प्रत्येक वेळेस वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
४. ज्या प्रकरणात निवडसूची तयार करण्याची कार्यवाही पुढील २ वर्षे न होता तिसऱ्या वर्षी निवडसूची केल्यास पहिल्या वेळेस पदोन्नतीस नकार दिलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या वर्षी होणाऱ्या निवडसूचीत पदोन्नतीसाठी विचार करण्यात यावा. (उदा. सन २०१५ च्या निवडसूचीत नकार दिलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सन २०१६ व २०१७ मध्ये जरी निवडसूची झाली नाही तरी सन २०१८ मध्ये निवडसूची झाल्यास सन २०१८ च्या निवडसूचीमध्ये त्यांचा विचार करण्यात यावा.)
५. पदोन्नती नाकारणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्याचा पदोन्नती नाकारण्यासंदर्भातील अर्ज विभागीय • पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकापूर्वी प्राप्त झाल्यास किंवा पदोन्नतीचे आदेश निर्गमित केल्यानंतर देखील प्राप्त झाल्यास ते विचारात घेऊन संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नाव निवडसूचीतून वगळण्यात यावे.
६. वरच्या पदावर पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर पदोन्नतीचे पद स्विकारण्यास नकार दिलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची वरच्या पदावरील सेवाज्येष्ठता ही ज्या वेळेस संबंधित
अधिकारी / कर्मचारी पुढील निवडसूचीत (३ वर्षानंतरच्या) पदोन्नतीस पात्र ठरेल व प्रत्यक्ष पदोन्नतीच्या पदावर रुजू होईल त्या दिनांकापासून विचारात घेतली जाईल.
७. पदोन्नती नाकारलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यास, त्याने ज्या निवडसूचीमध्ये निवड होऊन देखील पदोन्नती स्विकारली नाही त्या निवडसूचीतील अधिकाऱ्याचा व त्यानंतरच्या दोन्ही निवडसूचीतील अधिकाऱ्यांचा मानीव दिनांक प्राप्त होणार नाही.
८. पदोन्नती नाकारलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजने अंतर्गत लाभ दिले असल्यास ते काढून घेण्यासंदर्भात वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार कार्यवाही करण्यात यावी.
९. पदोन्नती नाकारलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यामुळे रिक्त झालेल्या किंवा रिक्त होणाऱ्या पदावर संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याच्या प्रवर्गानुसार / ज्येष्ठतेनुसार पात्र ठरणाऱ्या कनिष्ठ अधिकारी / कर्मचाऱ्याचा निवडसूचीत समावेश करण्यात यावा.
(सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१६०९१२१६२९०९९९०७ असा आहे)
📱📈मोबाईलवर काढा ‘शालार्थ’ रिपोर्ट