असर २०२३ अहवालाच्या पार्शभूमीवर शिक्षण व्यवस्थेच्या पर्यवेक्षणाची यंत्रणा मजबूत करण्याबाबत.
पर्यवेक्षीय यंत्रणेस खालील सूचना प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे दसण्यात आल्या आहेत–
अ) केंद्रप्रमुखांनी त्यांच्या अधिनस्थ शाळांना सातत्याने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक भेटी (Surprise Visit) द्याव्यात.
आ) कोणत्याही इयत्तेतील विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी जाणून घेण्यासाठी त्यांनी इयत्तेनुसार चाचणी घेऊन विद्यार्थ्यांना कितपत आकलन झाले आहे याची तपासणी करावी.
इ) उपरोक्त प्रमाणे केलेल्या तपासणीचा अहवाल असमाधानकारक असल्यास संबंधित शिक्षकाला अधिकच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याची शिफारस त्यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्याकडे करावी.
ई) शिक्षणाधिकाऱ्यानी उपरोक्तप्रमाणे शिफारस प्राप्त झाल्यास संबंधित शिक्षकास अधिकच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे पाठवावे,
उ) शिक्षकाने अतिरीक्त प्रशिक्षण घेऊनही विद्याथ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत फारशी वाढ झाली नसल्याची बाब निदर्शनास आल्यास शिक्षणाधिकाऱ्याने तशा आशयाचा अहवाल यथास्थिती शिक्षण संचालक, प्राथमिक / माध्यमिक यांना सादर करावा.
ऊ) संबंधित शिक्षणाधिकाऱ्याने केंद्रप्रमुखाच्या उपरोल्लेखित पर्यवेक्षणाच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवावे व त्यांच्याकडून याबाबतचा अहवाल दरमहा प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी.
- सदरचे आदेश तात्काळ प्रभावाने अंमलात येतील व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची असेल.