दहावी, बारावीच्या परीक्षाचे वेळापत्रक होणार जाहीर ! यंदा नेहमीप्रमाणे दहावी,बारावीची ऑफलाईन परीक्षा

364


प्रभाकर कोळसे : हिंगणघाट ( वर्धा)
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱया दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. यंदा शिक्षण मंडळाच्या वतीने ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार असून कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर शाळा उशिराने सुरू झाल्यामुळे परीक्षादेखील एक-दोन आठवडे उशिराने सुरू होणार आहेत.
दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात तर दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडय़ात घेण्यात येते. राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मान्यतेसाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले असून वेळापत्रकाला मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यामार्फत वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षा पासुन दहावी, बारावीच्या परीक्षाचे आफलाईन वेळापत्रक पुरते कोलमडले असले तरी यंदा थोडे फार उशीराने का होईना दहावी बारावीच्या परीक्षा पुर्ववत आफलाईन होणार असल्याने शिक्षण क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here