वेळापत्रक;शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2022

324

उपरोक्त संदर्भीय प्रसिध्दीपत्रकान्वये परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. २०/०७/२०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहिर करण्यात आले होते.

तथापि सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर परीक्षा दि. २०/०७/२०२२ ऐवजी रविवार दि. ३१/०७/२०२२ रोजी घेण्यात येईल.

यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. ३१/०७/२०२२ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. उपरोक्तनुसार झालेल्या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here