महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार नियमित शिक्षणासोबत कौशल्य आधारित शिक्षण; राज्य सरकारने केला इन्फोसिस सोबत करार

292

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर: नियमित शिक्षणासोबतच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण मिळावे आणि नवनवीन कौशल्याधारित तांत्रिक शिक्षण घेऊन त्याचा रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा. या उद्देशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. उदय सावंत यांनी दिली.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्या करारामुळे जवळपास 40 लाखाहून अधिक विद्यार्थी आणि एक लाख प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपयोग होणार आहे. हे शिक्षण पूर्णपणे इन्फोसिस मार्फत मोफत असून याचा राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.

इन्फोसिस या कंपनीने सामाजिक बांधिलकी जोपासत (CSR) अंतर्गत विविध विषयांवर आणि विविध कालावधीचे 3 हजार 900 पेक्षा अधिक ऑनलाइन कोर्सेस तयार केलेले आहेत. हे सर्व कोर्सेस कंपनीच्या स्प्रिंग बोर्ड ऑनलाइन मंचावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे संपूर्ण अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इन्फोसिस तर्फे निशुल्क आणि औपचारिक अभ्यासक्रमासोबतच उपलब्ध होणार आहेत.
इन्फोसिस पारदर्शी प्रकल्प म्हणून सर्वप्रथम नागपूर येथे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सोबतच तंत्रनिकेतन महाविद्यालय रत्नागिरी हा प्रकल्प राबवण्यात जाणार आहे.

या अभ्यासक्रमामध्ये संगणकाच्या प्रोग्रॅमिंग भाषा, क्लाऊड तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या तांत्रिक कोर्सेस सोबतच बिझनेस कमुनिकेशन, बिझनेस इंग्लिश, अर्थशास्त्र, लेखन कौशल्य, सकारात्मकता, नेतृत्व कौशल्य इत्यादी विषयाचे महत्वपूर्ण कोर्सेस असणार आहेत. अशी माहिती मा. उदय सावंत यांनी दिली या समजंस्य करारामुळे तांत्रिक शिक्षण संचालनालय अंतर्गत 1600 महाविद्यालयातील किमान 10 लाख विद्यार्थ्यांना आणि उच्च शिक्षण संचालनालय अंतर्गत 3 हजार महाविद्यालयातील 30 लाख विद्यार्थ्यांना अशा एकूण 40 लाख विद्यार्थ्यांना या इन्फोसिसच्या उपक्रमाचा फायदा होणार आहे.

ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये.

▫️ या उपक्रमातील कृति प्रवण (Learn by Doing) शिक्षणामुळे रोजगारासाठी आवश्यक व्यवसायिक कौशल्य विकसित करून रोजगार क्षमता वाढवण्यासाठी या कोर्सची मदत विद्यार्थ्यांना होणार आहे.

▫️ उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षक वर्गाला या मंचावर उपलब्ध सगळे कोर्सेस वापरता येणार आहेत.

▫️ आधुनिक तंत्रज्ञान प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज, संभाषण कौशल्य, प्रकल्प व्यवस्थापन इत्यादी व्यवसायाशी संबंधित कौशल्य प्राप्त करण्याकरिता औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन लाभत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व व्यावसायिक रोजगाराविषयी ची कौशल्य प्राप्त करून घेता येणार आहेत.

▫️ या उपक्रमांतर्गत डिजिटल किंवा आभासी पद्धतीच्या सर्व वर्गखोल्या तयार करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे काम संस्था करू शकणार आहे. तसेच याद्वारे ऑनलाईन परीक्षा देखील घेतल्या जाणार आहेत.

▫️ स्प्रिंग बोर्ड मंचावर उपलब्ध कोर्सेस विद्यार्थ्यांकरिता वैकल्पिक कोर्सेस शिकवले जाणार आहेत व त्यासाठी शिक्षक वर्ग त्यांच्या आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमाचे संचलन करतील.

▫️ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी आणि शासकीय विज्ञान संस्था नागपूर या संस्थांसाठी विशेष करून तयार केलेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना वरील सर्व सुविधा सोबतच प्रोजेक्ट इंटरंशिप बद्दलचे सुद्धा सुविधा आणि एल.एम.एस.सी ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रोजेक्ट इंटरंशिप आणि व्यावसायिक कौशल्य वाढवणाऱ्या कोर्सेस मुळे या दोन्ही संस्थातील विद्यार्थी रोजगारक्षम नक्कीच होणार आहेत.

▫️ महाराष्ट्र राज्य अध्यापन प्रशिक्षण संस्था अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण वर्ग राबवणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले डिजीटल कन्टेन्ट तयार करणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे, मॅनेजमेंट सिस्टीम तयार करणे इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देखील इन्फोसिस कंपनीच्या विशेष तज्ञ मार्फत दिले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here