सतीश लाडस्कर,भंडारा
तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य माणसाच्या जीवनात दिवसेंदिवस क्रांती घडत आहे. Covid 19 च्या परिस्थितीत आता बऱ्याच कार्यालयीन कामाकरिता कोविड 19 चे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सध्या लोकांना CoWin पोर्टलवर लॉग इन करून त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करावे लागते. परंतु, ज्या नागरिकांना कोविड -१९ चे लसीकरण करण्यात आले आहे त्यांना आता काही सेकंदात व्हॉट्सअॅपद्वारे लसीकरण प्रमाणपत्र मिळू शकते, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या कार्यालयाने सांगितले.
COVID-19 लसीकरण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील प्रमाणे ट्रिक वापरून अगदी काही क्षणात आपण आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊ शकतो. परंतु, आपण लसीकरणासाठी ज्या मोबाईल नंबरवरून नोंदणी केली त्याच नंबरचे व्हाट्सऍप अकाउंट असणे गरजेचे आहे.
★खालील 👇स्टेप्स द्वारे आपले कोविड 19 लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
◆ सर्वप्रथम आपल्या फोनबुक मध्ये 9013151515 हा संपर्क क्रमांक जतन ( save ) करा.
◆ आता आपलं व्हाट्सऍप ओपन करा.( आपण लसीकरणासाठी ज्या मोबाईल नंबरवरून नोंदणी केली त्याच नंबरचे व्हाट्सऍप अकाउंट असणे गरजेचे आहे.)
◆ त्यानंतर आपण सेव्ह केलेल्या वरील संपर्क क्रमांकावर “Send Covid Certificate” असा मेसेज पाठवा.
◆ आता आपल्याला टेक्स्ट मेसेज द्वारे एक सहा अंकी ओटीपी प्राप्त होईल, तो ओटीपी एंटर करा व पाठवा.
◆ लगेच काही सेकंदात तुमचे प्रमाणपत्र pdf स्वरूपात प्राप्त होईल, ते डाउनलोड करून घ्या.
अशा प्रकारे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने व्हाट्सऍप वर आपण आपले कोविड 19 लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त करू शकता.