मुक्त विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्रे आता डिजिटल लॉकर वर

445

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहार: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र आता डिजीलॉकर सुविधेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रणालीचे उद्घाटन कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, प्रोग्रॅमर राजेंद्र मरकड, डाटा प्रोसेसिंग सुपरवायझर प्रेमनाथ सोनवणे, सॉफ्टवेअर इंजिनियर प्रदीपकुमार पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2018-19 व 2019-20 मधील मे-2019 आणि मे-2020 परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या 2 लाख 90 हजार विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र हे डिजीलॉकर सुविधा मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यानंतर दुसऱ्या टप्प्यात पदवी प्रमाणपत्र ही टप्प्याटप्प्याने डीजीलॉकर सुविधा मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
भारत सरकार राबवत असलेल्या ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमांतर्गत मुक्त विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांचे शैक्षणिक मानपत्र डीजीलॉकर मध्ये उपलब्ध करून देण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार डिजीलॉकर अकॅडमी अवर्ल्ड रेकॉर्ड केली आहे. त्यानुसार सन 2019 मधील 2 लाख 90 हजार विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे ई स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी www.digilocker.gov.in या संकेतस्थळावर किंवा डिजिलॉकर ॲप या पर्यायावर क्लिक करून आपले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे नाव निवडून नंतर पदवी प्रमाणपत्र विकल्प निवडून आपला शैक्षणिक माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यास त्यांचे पदवी प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात डिजिलॉकर वर उपलब्ध होणार आहे.

❓डिजीलॉकर मध्ये पदवी प्रमाणपत्र असे ठेवा

▪️डिजीलॉकर ॲप प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना अकाऊंट उघडावे लागेल.
▪️ गेट डॉक्यूमेंट फॉर्म युनिव्हर्सिटी प्रकल्पावर क्लिक करावे लागेल.
▪️ नंतर नोंदणी क्रमांक टाकून परीक्षा उत्तीर्ण वर्षाचे वर्ष निवडावी लागेल.

विद्यार्थ्यांचे सुरक्षित होणार आहेत आणि विद्यार्थी आपली पदवी डाऊनलोड सुद्धा करू शकणार आहे

❓हे माहिती असू द्या.
आपल्याला मिळालेले प्रमाणपत्र त्यावर बारकोड असेल तो स्कॅन केल्याने आपली शैक्षणिक माहिती सुद्धा उपलब्ध होईल.
ज्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र साठी अर्ज सादर करतेवेळी आपला आधार क्रमांक नोंदविला असेल. अशा विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र आधार क्रमांक आला डिजिटल लॉकर मध्ये लिंक करण्यात आलेले आहे. डिजिटल पदवी प्रमाणपत्र वर डिजिटल साईन असून त्यास माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार कायदेशीर वैधता राहील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here