शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निष्ठा (National Initiatives for School Head’s and Teachers Holistic Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक २१ ऑगस्ट २०१९ रोजी करण्यात आली. यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन २०२० २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण हे राज्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी आयोजित केले जात आहे.
यानुसार सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये दीक्षा अॅपच्या माध्यमातून घेतले जाणार असल्याने दीक्षा अॅप वर राज्यातील सर्व शासकीय व शासकीय अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील (इयत्ता ९ वी ते १२ वी च्या वर्गाना अध्यापन करणाऱ्या) शिक्षक व मुख्याध्यापक यांनी नोंदणी करावयाची आहे. नोंदणी केलेल्या शिक्षकास/ मुख्याध्यापकासच ऑनलाईन प्रशिक्षण घेता येईल याची नोंद घ्यावी.
दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ अखेर सदरची नोंदणी ही सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी करावयाची आहे.
नोंदणी करण्यासाठीच्या मार्गदर्शक व्हिडीओ https://drive.google.com/file/d/1NB0qxnM8TBLIO_BqjVi-uN5ufmbMmsGH/view
या लिंकवर क्लिक करून पाहू शकतात.