▪️
▪️परीक्षा दिनांक – 20 जानेवारी 2024
भारत सरकारने 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जवाहर नवोदय विद्यालये सुरु केली. सध्या 27 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवाहर नवोदय विद्यालये आहेत. भारत सरकारच्या संपूर्ण आर्थिक सहाय्याने “नवोदय विद्यालय समिती” या स्वायत्त यंत्रणेमार्फत मुलां-मुलींसाठी निवासी जवाहर नवोदय विद्यालये सुरु करण्यात आलेली आहेत. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत ‘जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेद्वारे प्रवेश देण्यात येतो. शिक्षणाचे माध्यम इयत्ता आठवी पर्यंत मातृभाषा किंवा क्षेत्रिय भाषा असून त्यानंतर गणित व विज्ञान इंग्रजी भाषेतून आणि समाजशास्त्र हिंदी भाषेतून शिकविण्यात येतात. जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बोर्ड (इयत्ता 10वी व 12वी) परीक्षांना बसतात. या विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजन,गणवेश, निवास आणि वह्या-पुस्तके आदींची मोफत व्यवस्था केली जाते.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी काही महत्वाच्या सूचना
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीचा ऑनलाईन अर्ज भरतांना पुढील सूचनांचे पालन करावे.
- अर्जाचा नमुना व माहितीपत्रक कृपया काळजीपूर्वक वाचा. संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व पूर्णपणे भरा. तसेच इतर पात्रता अटी जसे इयत्ता 3,4,5 शासनमान्य / शासन संलग्न / शासन प्रमाणित / राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था मधील आहे याची खात्री करून घ्या.
- ऑनलाईन अपलोड करण्यासाठी लागणारी कागदपत्रे जसे जातीविषयीची जसे सामान्य, अनु. जाति, अनु.जमाती, ओबीसी आणि दिव्यांग संवर्गाची, मुलगा/मुलगी तसेच शहरी/ग्रामीण इत्यादींची माहिती असणारे प्रमाणपत्र तयार करून मगच अर्ज भरा. जर प्रवेश घेतेवेळी या मध्ये तफावत आढळल्यास त्याची/तिची निवड अपात्र ठरू शकते.
- अ) प्रवेश अर्जातील जन्मदिनांक आकड्यात आणि अक्षरी दोन्ही पद्धतीने लिहा. शाळेतील नोंदीनुसार तो बिनचूक लिहा. जन्मदिनांक शाळेतील नोंदीपेक्षा भिन्न आढळल्यास त्या उमेदवाराचा प्रवेश रद्द होऊ शकतो.
- ब) कायमस्वरूपी असणाऱ्या जन्मखुणेचा उल्लेख प्रवेश अर्जामध्ये उमेदवाराने करणे आवश्यक आहे.
- जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवडचाचणीसाठी अर्ज करतांना उमेदवाराची तसेच पालकाची स्वाक्षरी अपलोड करणे अनिवार्य आहे.
- ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत – 10 ऑगस्ट 2023 पर्यंत
जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे👉 क्लिक करा