४ ऑक्टोबर पासून सुरू होणार राज्यातील शाळा;मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

462

4 ऑक्टोंबरपासून वाजणार शाळेची घंटा: माननीय मुख्यमंत्री यांचा महत्वपूर्ण निर्णय

पूर्ण स्थिती सामान्य झाल्याची परिस्थिती आज महाराष्ट्रात दिसत आहे. त्या अनुषंगाने आता माननीय मुख्यमंत्री यांनी 4 ऑक्टोंबर पासून शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात याआधीही ऑगस्ट मध्ये प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्या वेळी त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. गेल्या काही वर्षापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटे पासून राज्यातील सर्वच शाळा ह्या बंद होत्या. त्यानंतर पहिली लाट ओसरल्यानंतर काही वर्ग सुरू करण्यात आले होते. पण दुसऱ्या लाट आल्यानंतर पुन्हा वर्ग बंद झालेले. विद्यार्थी मागच्या दिड वर्षापासून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. यापुढे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याचा विचार करीत मा. मुख्यमंत्र्यांनी कोरोना नियमांचे संपूर्ण पालन करून शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
बहुतांश ठिकाणी लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचे लसीकरण सुद्धा झालेले आहे. त्यामुळे 4 ऑक्टोंबर पासून शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आला आता मंजुरी देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here