आता एक व्हाट्सऍप अकाउंट वापरा चार वेगवेगळ्या डिव्हाईस वरून, (Whatsapp चे नवे फिचर उपलब्ध)

372

सतीश लाडस्कर,भंडारा

WhatsApp लवकरच आपल्या युजर्ससाठी Multi-Device फिचर सादर करणार आहे. या नवीन फिचरचा वापर करून युजर्स मूळ Device व्यतिरिक्त एका अकॉउंटशी चार इतर Device जोडू शकतील. परंतु, जे Device कनेक्ट करायचे आहेत ते फोन च्या व्यतिरिक्त इतर साधने असणे आवश्यक आहे. म्हणजेच आपण आपले व्हाट्सऍप अकाउंट पीसी, टॅबलेट, लॅपटॉप अशा साधनांशी कनेक्ट करू शकता.
लोकप्रिय मेसेंजरच्या 2.21.19.9 अपडेटमधून सर्व वापरकर्त्यांना Multi-Device फिचर वापरण्याची संधी मिळेल. हे Update अँड्रॉइड तसेच आयओएसवर देखील उपलब्ध असेल.
या फिचरची घोषणा कंपनीने जून 2021 मध्ये केली होती. या फिचरच्या मदतीने आपण फोन सोडून पीसी, मॅक आणि टॅबलेट ही साधने आपल्या मुख्य व्हॉट्सअ‍ॅप अकॉउंटशी जोडू शकतो. एकदा अकाउंट जोडल्यांनतर आपल्या मूळ डिवाइसमध्ये इंटरनेट कनेक्शन नसले किंवा फोन बंद असला तरी जोडल्या गेलेल्या डिवाइसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येईल.

★ Whatsapp वर Multi-device फिचर वापरण्यासाठी खालील 👇स्टेप्स follow करा.

◆ सर्वप्रथम WhatsApp ओपन करा.

◆ आता उजवीकडे वरच्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.

◆ त्यानंतर Linked Devices हा पर्याय निवडा.

◆ त्यांनतर Multi-Device Beta या पर्यायावर क्लिक करा.

◆ शेवटी Join Beta हा पर्याय निवडा.

अशाप्रकारे आपण आपल्या व्हाट्सऍप अकाउंटला दुसरे Device कनेक्ट करू शकाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here