‘टिलिमिली’ पुन्हा आपल्या भेटीला दिनांक २१ सप्टेंबर २०२१ पासून…

475

टिलीमिली” मालिका ‘बालभारती च्या पहिली ते आठ इयत्ता च्या पाठ्यपुस्तकातील पाठांवर व त्यातील संकल्पनांवर आधारित आहे. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नाहीत, घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतीनिष्ट उपक्रमातून या मालिकेत भूमिका करणाऱ्या मुलांना शैक्षणिक अनुभव घेऊ दिले जातात, त्यांच्याभोवती छोट्या छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जाते, त्यांना ताण येऊ नये यासाठी स्वच्छ, मोकळे, आनंदी वातावरण व भावनिक सुरक्षितता असते व चुका करत स्वत:ची अर्थबांधणी स्वत:च करण्याचे स्वातंत्र्य दिलेले असते. असे केल्याने मुले हसत-खेळत स्वत:च कशी शिकतात हे मालिकेच्या प्रत्येक भागात बघायला मिळेल. अशी सहज, आनंददायक व ज्ञानरचनावादी प्रकिया उलगडत राहिल्याने लक्षावधी मुलांना मालिका रोज स्वतः शिकण्याची स्फूर्ती देत राहील, त्यांचा आत्मविश्वास वाढवत राहील व स्वतःच कसे शिकायचे हे शिकवत राहील.

जेव्हा औपचारिक व्यवस्था बंद ठेवावी लागते तेव्हा परिसरातले उत्साही व अभ्यास पालक, ताई, दादा, मावशी, काका स्वयंस्फूर्तीने कसा पुढाकार घेतात व आपल्या कॉलनीतल्या, बाडीतल्या, बस्तीतल्या किंवा शेजारच्या एकेक दोन-दोन मुलांच्या गटांना ज्ञानरचना करायला रोज आपल्या घरी अनौपचारिक शिक्षणाची मदत कशी करू शकतात हेही -टिलीमिली” मालिका जाताजाता दाखवत राहते. त्यामुळे अनेक ठिकाणी बाडीवस्ती-शिक्षण’, ‘कॉलनी-शिक्षण’ किंबा ‘मोहल्ला-तालिम’ देणारे ‘ज्ञानरचना सुलभक राज्यात पुढे यावेत अशी अपेक्षा आहे.

सामान्यतः कृत्तीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने अमराठी माध्यमात शिकणाऱ्या पण मराठी समजणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मालिका उपयुक्त वाटेल,

सह्याद्री’ दूरदर्शनवरील ही महामालिका टाटा स्काय वर १२७४, एअरटेलवर ५४८, डिश टीवी वर १२२९, व्हिडिओकॉन d2h वर ७६९, डीडी फ्रीडिश वर ५२५ आणि हाथवे वर ५१३ या क्रमांकांच्या चैनल्सवर बघता येईल.

टिलीमिली” महामालिकचे दैनंदिन प्रसारण (रविवार वगळून) खालीलप्रमाणे असेल:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here