काही क्षणात परत मिळवा, फोनमधून डिलीट झालेले सर्व कॉन्टॅक्ट!, अशी आहे सोपी ट्रिक.

540

सतीश लाडस्कर,भंडारा

आपल्या मोबाईल फोनबुकमधून जर चुकून काही किंवा सर्वच संपर्क (contacts) डिलीट झाले असतील, तर घाबरण्याची गरज नाही. आता चुकीने डिलीट झालेले सर्व कॉन्टॅक्ट म्हणजेच संपर्क आपण सहज (Restore) करून परत मिळवू शकतो.
google च्या (Android Operating Systeme) अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित मोबाईलफोनमध्ये क्लाउड संपर्क (Cloud Contacts) ही एक संपर्क साठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. गुगल वेळोवेळी आपले संपर्क, क्लाउड (Cloud) मध्ये संचयित करते. त्यामुळे आपण आपल्या (Contact list) संपर्क यादीतून एखादा मोबाइल नंबर डिलीट झाला असेल तर तो सहज परत मिळवता येतो. या सुविधेचा लाभ मिळण्यासाठी आपल्या अँड्रॉईड मोबाईल फोनमध्ये, गूगल संपर्क (Google Contacts) हे अॅप इन्स्टॉल असणे गरजेचे आहे.

आपल्या मोबाईल फोन मधून चुकून डिलीट झालेले संपर्क (कॉन्टॅक्ट) परत मिळवण्यासाठी खालील👇 ट्रिक वापरा.

◆ सर्वप्रथम Google Contact (गुगल संपर्क) हे अॅप ओपन करा.

◆ आता, वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या मेनूवर क्लिक करा.

◆ त्यानंतर सेटिंग्ज (settings) हा पर्याय निवडा.

◆ आता दिलेल्या पर्यायांपैकी, मॅनेज कॉन्टॅक्ट,(Manage Contacts) यामधील रिस्टोर (Restore) या पर्यायावर क्लिक करा.

◆ त्यानंतर, जर आपल्या फोनमध्ये एकापेक्षा जास्त गुगल अकाउंट असतील, तर ज्या अकाउंट मधील संपर्क रिस्टोर (Restore)करायचे असतील ते Google अकाउंट निवडा.

◆ आता डायलॉग बॉक्स उघडेल, ज्यामध्ये आपल्याला (google Contacts) पुन्हा सुरू करायचा आहे.

◆ त्यानंतर आपल्याला ज्या दिवसापासूनचे कॉन्टॅक्ट रिस्टोर Restore करायचे आहे, ती तारीख निवडायची आहे.

◆ सर्वात शेवटी Confirm या पर्यायावर क्लिक करा.

  अशाप्रकारे आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून किंवा फोनबुक मधून डिलीट झालेले सर्व  संपर्क रिस्टोर (Restore) होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here