(आदिनाथ सुतार अकोले)
अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसुबाई हरिश्चद्रगड अभयारण्य क्षेत्रातील अंबित हे मुळा नदीच्या उगमस्थानाजवळील अतिदुर्गम आदिवासी गाव. प्रतिवर्षी येथे हजारो मिलीमीटर पाऊस या भागात पडत असतो. पावसाळ्यात येथील जनजीवन विस्कळीत होऊन नजिकच्या शहरासी संपक॔ तुटतो.नेटवक॔ नसल्याने वैद्यकीय व इतर सुविधापासून हा भाग चार महिने वंचितच असतो आशा प्रतिकूल परिस्थितीतील माणूस येथील जीवनात उद्भवणार्या समस्याबरोबर नेहमीच दोन हात करत आला आहे. मात्र येथील संकटाची मालिका सुरूच असते.
शनिवार दि. 24/7/2021रोजी रात्री आंबीत येथील शेतकरी श्री. रामभाऊ धोंडू भारमल यांचे घर आगीच्या भस्यस्थानी पडून जळून खाक झाले गरीबीच्या संसारातील होते नव्हते ते जळुन गेल्याने दुखाःचे आभाळ या कुटुंबावर कोसळल्यामुळे सर्वस्व हारपलं होते. आशा बिकट प्रसंगी सदर घटनेची माहिती मिळताच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूरचे प्रकल्प अधिकारी श्री. संतोष ठुबे यांनी घटनेची माहिती घेऊन राजूर प्रकल्पातील आश्रम शाळा शिक्षकांनी कोरोना काळात आदिवासी कुटुंबांना संकट काळात तातडीची मदत देण्यासाठी उभा केलेल्या प्रकल्पस्तरीय मदत निधीफंडातून तातडीची मदत करणेसाठी
मदतीसाठीची सुत्रे हालवून शिरपुंजे व पिंपरकणे येथील आश्रमशाळा अधिक्षक श्री. कैलास सोनार व पंकज श्रीवास तसेच शिक्षक श्री. डोंगरू बारामते यांचेमाफ॔त बाधित कुटुंबाला मदत म्हणून एक महिण्याचा किराणा साहित्य व लहान मुलांना नवीन कपडे देऊन जळीत कुटुंबाचे आसू पुसण्याचे काम केले आहे.
मातीला जे होते दगड धरून
त्यांचेही भरून आले डोळे
असीच स्थिती मदतीने भारवलेल्या कुटुंबाची सदर प्रसंगी झाली होती.
या प्रसंगी राजूर पोलिस स्टेशनच सहा. पोलिस निरीक्षक श्री.नरेंद्र साबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. आश्रमशाळा शिक्षकांनी ऊभा केलेल्या मदत निधीतून नगर जिल्ह्यातील अनेक संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदत करून माणूसकीची भिंत ऊभा करण्याचे काम आश्रमशाळा शिक्षकांनी केल्याचे गौरव उदगार प्रस्तुत प्रसंगी राजूर पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक श्री नरेंद्र साबळे यांनी काढले.
Home आदिवासी विकास विभाग आश्रमशाळा शिक्षकांनी ऊभा केली माणूसकीची भिंत- आंबित येथील आदिवासी कुटुंबाला दिला मदतीचा...