दुसरे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत संपन्न..

386

प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव द्वारा आयोजित दुसरे अखिल भारतीय बेळगाव ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन दि. २५ जुलै २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता गुगल मिटवर आयोजीत करण्यात आले होते. या काव्य संमेलनाचे उद्घाटक- मा.संजयजी राऊत खासदार, संमेलनाध्यक्ष- मा.श्रीरामजी पचिंद्रे,ज्येष्ठ साहित्यिक, स्वागताध्यक्ष- मा.शरदजी गोरे संस्थापक,अ.भा.म.सा.प,संमेलनाचे निमंत्रक- मा. रवींद्र पाटील, प्रदेशाध्यक्ष कर्नाटक, संयोजक- ॲड.सुधीर चव्हाण जिल्हाध्यक्ष बेळगाव या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन खासदार संजयजी राऊत यांच्या हस्ते पहिले पुष्प संपन्न झाल्यानंतर दुपारी १.०० वाजता साहित्य संमेलनाचे दुसरे पुष्प गुंफताना कवीसंमेलनात सीमाभागातील, मुंबई ,पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास ७० कवी,कवयित्री यांनी सहभाग घेतला होता. सर्व सारस्वतांनी आशयपूर्ण, सोबतच ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या कविता सादरीकरण करून काव्य रसिकांचे मन शब्दातून जिंकले. कवी संमेलन सूत्रसंचालन खूप सुंदर झाले. या सुंदर, बहारदार अश्या पद्धतीने आज संपन्न कवी संमेलन अध्यक्ष म्हणून आनंदकुमार शेंडे साहित्यिक विदर्भ विभागीय अध्यक्ष निवड करण्यात आली होती. त्यांनी सर्व सहभागी कवी कवयित्री यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील काव्यात्मक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यास साहित्य संमेलनामध्ये राजश्री बोहरा प्रतीक्षा अध्यक्ष मुंबई प्रदेश, नवनाथ गायकर जिल्हाध्यक्ष नाशिक, आप्पासाहेब गुरव,अध्यक्ष मराठा मंदिर बेळगाव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच साहित्य संमेलन यशस्वितेसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगावचे मा.रवींद्र पाटील कर्नाटक प्रदेशाध्यक्ष यांनी काव्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदित कवी, साहित्यिकांना आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेद्वारे सशक्त ऑनलाइन साहित्यिक विचारपीठ मिळवून दिले त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले. कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन रोशनी हुंद्रे व प्राध्यापिका मनीषा नाडगौडा यांनी केले तर जिल्हा उपाध्यक्ष डी .बी .पाटील यांनी आभार मानले. संमेलनाची रंगतदार पद्धतीने काव्याद्वारे सांगता करण्यात आली.

अशाप्रकारे नवनवीन व्हिडिओ,कविता, कवी संमेलन, विविध स्पर्धा, विविध उपक्रम, कार्यक्रमाचे व्हिडिओ ऑडिओ बघण्याकरिता कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे साहित्य कवी संमेलनाचे संपूर्ण व्हिडिओ ऑडिओ खाली दिलेल्या प्लेलिस्टमध्ये परिषदेच्या अधिकृत यूट्यूब चैनल वर अपलोड केलेले आहे तरी सर्वांनी आवर्जून बघावे व कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा ही विनंती….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here