— भागवत भंगे
आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सार्वत्रिक उपलब्धतेबरोबरच गुणवत्तापुर्वक शिक्षण देणेकरिता शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी चालना मिळावी म्हणून आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयात शैक्षणिक गुणवत्ता कक्ष अथवा थिंक टँकची स्थापना होणार.
शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या कामात शाळा स्तरावर प्रयत्न करण्यासाठी तसेच शिक्षकांना ऑनसाईट मदत देण्यासाठी प्रकल्प स्तरावर शिक्षक सहयोगी दलाची स्थापना होणार.
आश्रमशाळांच्या अधिक चांगल्या शैक्षणिक कामगिरीकरीता विविध शैक्षणिक मुद्द्यांवरील चर्चा व त्यावर आधारीत उपक्रम तयार करणे, विविध विषयातील संकल्पना संबोध सुलभ पद्धतीने समजावुन सांगण्यासाठी शैक्षणिक साहित्याची निर्मिती व त्याची उपलब्धतता करुन देणे, शिक्षकांमध्ये सतत व्यावसायिक सुधारणा घडवुन आणणेकरिता शिक्षण कक्षाची स्थापना करणे या हेतुने २०१९-२० करीता विशेष केंद्रिय सहाय्य अंतर्गत “Education cell and Resource for Field Offices. Along the lines of Teach for India/Gandhi fellows” व भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत “Gamified Learning for Ashram School Students या योजनांकरीता अनुक्रमे रु २००.०० लक्ष व रु.४८.१० लक्ष निधी शासन निर्णय Education cell and Resource for Field Offices ह्या एकूण रु.२४८.१० लक्ष किंमतीच्या योजनेच्या मार्गदर्शक सुचनांना सोबतच्या परिशिष्ट १ नुसार मंजुरी प्रदान करणेत येत आहे.
सविस्तर वृत्तासाठी खालील शासन निर्णयाचे अवलोकन करावे