आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने दिले वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिक्षक क्षमता चाचणी बहिष्काराचे निवेदन

256

आदिवासी विकास विभागाने शिक्षकांची गुणवत्ता तपासण्यासाठी दर तीन महिन्याला शिक्षकांची क्षमता चाचणी घेण्याचे ठरविले आहे, राज्यभरातील आश्रमशाळा शिक्षकांमध्ये या चाचण्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे, शिक्षकांच्या भावना लक्षात घेत शिक्षक क्षमता चाचण्यांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने घेतला आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.विक्रमजी गायकवाड व राज्य अध्यक्ष संतोषजी राऊत यांच्या सूचनेनुसार आज दिनांक- ११ सप्टेंबर रोजी राज्यभरात आयुक्त कार्यालय,अपर आयुक्त कार्यालये व प्रकल्प कार्यालयात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत शिक्षक क्षमता चाचणीवर बहिष्कार टाकत आसल्याचे सूतोवाच केले.
राज्य सरचिटणीस संजयजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मा. आयुक्त गुंड मॅडम, उपायुक्त नगरे साहेब,(अपर आयुक्त कार्यालय) सहा.प्रकल्प अधिकारी कांबळे साहेब यांना निवेदन देण्यात आले.या वेळी राज्यकार्यकारणीचे खजिनदार गोकुळ राव,सचिव नंदू जगताप, सह. खजिनदार उदय जोशी,यांसह नाशिक विभागीय सचिव मनोहर नेटवटे,उपाध्यक्ष नितीन केवटे,नाशिक प्रकल्प अध्यक्ष रामसिंग तडवी,उपाध्यक्ष संभाजी आगलावे,महिला उपाध्यक्ष शुभांगी पवार, किरण सोनवणे,अनिता आरोटे,बेबीताई बच्छाव,सोनाली सुसर,कोषाध्यक्ष शरद काकडे,आनंद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here