संदर्भ- शालेय शिक्षण विभाग शासन परिपत्रक दिनांक- ५ जुलै 2021
या शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून राज्यातील कोविड-मुक्त क्षेत्रात ग्रामपंचायती / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावांनी खालील निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
अ) ग्रामीण भागात कोविड मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा.
ब) शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गाना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक core विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या SOP चे पालन करावे.
कोविड संबंधी सर्व precautions चे काटेकोरपणे पालन करावे. उदा. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.
क) संबंधीत शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी. किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना ( SOP )सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ व परिशिष्ट ब मध्ये देण्यात येत आहे
परिशिष्ट-अ व परिशिष्ट ब आणि संबंधित शासन निर्णय परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा