शिक्षकांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजन

638

राज्यातील नवोपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे, तसेच राज्यातील शिक्षकांनी राबवलेले उत्कृष्ट नवोपक्रम इतर शिक्षकांना माहिती व्हावे, यासाठी ‘आशिष ई मासिक’ च्या प्रथम वर्धापन दिनामार्फत ‘राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे :

१) प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षकाना प्रोत्साहन देणे.
२) शिक्षकांच्या कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.
३) प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणार्‍या शिक्षकांना उत्तेजन देणे.
४) शिक्षकांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे.
५) शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक माहितीसाठी online आशिष मासिकात प्रकाशित करणे.
नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे:-

नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्यांच्या आधारे करावे.

१) नवोपक्रमाचे शीर्षक – उपक्रमाचे नेमके नाव लिहावे.

२) नवोपक्रमाची गरज व महत्व उपक्रम निवडण्याचे कारण, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ. चा तपशील.

३) नवोपक्रमाची उद्दिष्टे – हा उपक्रम मी का करतो आहे, उपक्रमाचा फायदा कोणाला? कसा, कोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार? या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.

४) नवोपक्रमाचे नियोजन.
• उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण.
• संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा.
• आवश्यक साधनांचा विचार.
• करावयाच्या कृतींचा क्रम.
• उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण.
• कार्यवाहीचे टप्पे. ( वेळापत्रक )
• उपक्रमासाठी इतरांची मदत.
• उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे.

५) नवोक्रमाची कार्यपद्धती.
I ) पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी.
II ) कार्यवाहीदरम्यान निरीक्षणे व माहिती संकलन.
III ) उपक्रम पूर्ण झाल्यावर निरीक्षणे व त्यांच्या नोंदी.
IV ) कार्यवाहीत आलेल्या अडचणी.
V ) माहितीचे विश्लेषण : आलेख, तक्ते ( आवश्यक वाटल्यास )

६) नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार) या उपक्रमातून कोणासाठी व काय सध्या झाले, याबाबतची मांडणी यात करावी. उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती मांडवी.

७) समारोप – आपली अस्वस्थता उपक्रमानंतर कशी दूर झाली व उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीकरिता कसा झाला, हे विशद करावे.

८) संदर्भसूची व परिशिष्टे – नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली इ. जे असेल ते परिशिष्टामध्ये जोडावे.

स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी

१ ) ही स्पर्धा महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांसाठी खुली स्पर्धा. कोणत्याही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षिका भाग घेऊ शकतात.

२ ) स्पर्धेत भाग घेताना कोणतेही फी आकारली जाणार नाही. अगदी विनामूल्य ही स्पर्धा आहे.

३ ) दिलेल्या वेळेत आपणास राबवलेला नवोपक्रम सादर करावा लागेल. मुदतीनंतर येणार्‍या उपक्रमांचा विचार केला जाणार नाही.

४ ) तज्ञ परीक्षकांमार्फत मूल्यमापन करून निकाल जाहीर केला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

५ ) सहभागी स्पर्धकांतून प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व १० उतेजनार्थ क्रमांक काढण्यात येतील. त्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, व सन्मानचिन्ह देण्यात येईल.

६ ) स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

७ ) उत्कृष्ट नवोपक्रमाना आशिष मासिकातून राज्यभर प्रसिद्ध करण्यात येईल.

स्पर्धेचे नियम

नवोपक्रम स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे :

१) स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम स्वतः शाळेत राबवलेला असावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र सादर करावे.
२) सादर करण्यात आलेला नवोपक्रम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणार्‍या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणार्‍या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन व लघुसंशोधन पाठवू नये.
३) नवोपक्रम लेखन मराठी, इंग्रजी किंवा हिंदी यांपैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा.
४) नवोपक्रम टाईप केलेला असावा व त्याची PDF करून पाठवावा.
५) हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
६) सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०१९-२० किंवा २०२०-२१ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेला असावा.
७) नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी. फाईल मध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त 5 फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.
८) नवोपक्रम फाईल PDF स्वरूपात जोडावी. PDF फाईल 5 ते 10 MB पेक्षा जास्त नसावी.
९) स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त होईल असा व्हिडिओ अथवा youtube वर असलेली लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंकवर विहित ठिकाणी नोंदवावी.
१०) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
११) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपणास दिलेल्या संपर्क व्हाट्सएप मोबाईल नंबर वर किंवा ई मेल वर PDF करून पाठवायचा आहे.
श्री. आशिष देशपांडे
9021481795
ashishemasik@gmail.com

कालावधी
१५ जून ते २० जुलै

निकाल
15 ऑगस्ट 2021

आशिष ई-मासिक जुलै महिन्याचा अंक डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here