जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित काव्यवाचन तथा काव्यगायन स्पर्धेचा निकाल जाहीर…

429

प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विदर्भ विभाग द्वारा आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “झाडे लावा झाडे जगवा” तथा “निसर्ग माझा सोबती” या विषयावर आयोजित राज्यस्तरीय स्वरचित ऑनलाइन काव्यगायन तथा काव्यवाचन स्पर्धा दिनांक ०१ जून ते ०५ जून 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील विविध राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचे स्वरचित व्हिडिओचे सादरीकरण विविध कवी/कवीयित्री मार्फत करण्यात आले. या स्पर्धेमध्ये लहान वयोगटात पासून तर प्रौढ व्यक्तींपर्यंतच्या सर्व वयोगटातील १०७ स्पर्धकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. त्यापैकी ६२ स्पर्धकांना विजयी बक्षिस प्रदान सन्मानपत्र आयोजकांच्या वतीने देण्यात आली आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आजच्या आधुनिकीकरण, औद्योगीकरण व जागतिकीकरणाच्या काळात पर्यावरणाचा समतोल कसा राखला जावा. वृक्ष संवर्धन, प्रदूषण नियंत्रण, पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन इत्यादी प्रकारच्या अनेक विषय पर्यावरण विषयक विषयावर आधारित स्पर्धकांनी आपल्या स्वरचित कवितेचे व्हिडिओ तयार करून एक पर्यावरण जनजागृती संदेश आपल्या काव्याच्या माध्यमातून दिलेला आहे. एकंदरीत स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांनी आपल्या निसर्ग विषयी असणारा जिव्हाळा प्रेम आत्मीयता आपल्या काव्याच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले.

त्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे विदर्भ विभागीय अध्यक्ष, या प्रबोधनपर स्पर्धेचे आयोजक श्री.आनंदकुमार शेंडे, स्पर्धेचे आयोजक, ग्राफिक्स तथा तांत्रिक संयोजक श्री. संदीप शेंडे, परीक्षक श्री. नीरज आत्राम व सौ.सोनाली सहारे रायपुरे, सौ. अलका धोंडणे साखरे सदस्या महिला आघाडी यांनी सर्व व्हिडिओचे संकलन केले. स्पर्धेविषयी वेळोवेळी राष्ट्रीय अध्यक्ष श्री.शरदजी गोरे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वी होण्याकरिता विदर्भ विभागातील सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. पर्यावरण विषयक आयोजित स्पर्धेच्या निकालाचा सोहळा व्हाट्सअप आणि फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून पार पडला. आयोजकांच्या वतीने सर्व स्पर्धकांचे सुंदर सन्मानपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here