अकरावी सामायिक प्रवेश परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावरच!

421


१०० गुणांची असणार सामायिक प्रवेश परीक्षा


प्रभाकर कोळसे, हिंगणघाट
कोरोना स़सर्गाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर यंदा राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. राज्यात अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे.
@ अशी राहील सामायिक प्रवेश परीक्षा
ही परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार असून परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील.विशेष म्हणजे ही परीक्षा विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे.
@ राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क
दहावीच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने अशा विद्यार्थ्यांना सामायिक परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही.

🛰️इस्रो मध्ये शालेय विद्यार्थ्यांना पाच दिवसाचा मोफत कोर्स करण्याची संधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here