शशिकांत इंगळे,अकोला
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांनी शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण अभ्यासासाठी रिमोट सेन्सिंग आणि उपयोगिता या विषयावर ५ दिवसीय मोफत कोर्स करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. सदरील कोर्स इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग या केंद्राद्वारे केला जाणार आहे. आणि सॅटेलाईट डाटा आणि इमेज प्रोसेसिंग यांच्या आधारे वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून जागृतता वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या गोष्टी जाणून घ्या:
▪️ भारतीय विद्यार्थ्यांसाठी वर्ग १० वी, ११वी आणि १२वी वर्गासाठी ५ दिवसाचा असेल
▪️कोर्स २६ जुलै ते ३० जुलै २०२१ या कालावधीत असेल.
▪️ तासिका IIRS यूट्यूब चैनल वर लाईव्ह प्रक्षेपित केले जातील
▪️ प्रति दिवशी पहिली तासिका सकाळी १० वाजता आणि दुसरी तासिका दुपारी १२ वाजता राहील.
▪️ विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असल्यास चाटबॉक्समध्ये ते प्रश्न विचारू शकतात त्यानंतर पाच मिनिटाचा खंड राहील.
▪️ विद्यार्थी दर दिवशी झालेल्या तासिकेवर प्रश्नोत्तरे करू शकेल. ▪️विद्यार्थ्याकडून लाइव्ह प्रक्षेपणात प्रत्यक्ष उपस्थित नसल्यास विद्यार्थी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ IIRS लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम पोर्टल (LMS) वर पाहू शकतो.
🔸अर्ज करण्याची पद्धत:
▪️ ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन माहिती पुस्तक वाचून घ्या.
👇
https://eclass-intl-reg.iirs.gov.in/schoolregistration
▪️ विद्यार्थ्याचे नोंदणीसाठी संपूर्ण माहिती भरा.
▪️फोटो jpg किंवा png फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
▪️तुमची नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुमच्या ईमेलवर युजरनेम आणि पासवर्ड पाठवला जाईल. त्याआधारे LMS पोर्टलवर लॉगिन करता येईल.
🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२१ आहे.
पाच दिवसाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर अभिप्राय नोंदवून ५ ऑगस्ट २०२१ आधी प्रमाणपत्र मिळवावे.