आता जिल्हा परिषद शाळांचे बांधकाम व इतर भौतिक सुविधा विषयक जवाबदारी सामग्र शिक्षा अभियंत्याकडे

506

जिल्हा परिषद शाळांचे नवीन बांधकाम, शाळा इमारत विशेष दुरुस्ती, पुनर्बांधणी व इतर भौतिक सुविधा विषयक बांधकामे इत्यादी विविध योजनांतर्गत मंजूर केलेली सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत अभियत्यांकडे सोपविणेबाबत.

राज्यातील सर्व शाळांकरिता वर्गखोली, मुलां/ मुलींकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळा विशेष दुरुस्ती, संरक्षण भिंत, खेळाचे मैदान, उताराचा रस्ता (रॅम्प) स्वयंपाकगृह इ. मुलभूत सुविधांचे निकष शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने निश्चित केलेले आहेत. तसेच, समग्र शिक्षा / सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांना मुलभूत भौतिक सुविधांचे बांधकामे करण्यात येते. सदर योजनातंर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत बांधकाम व सुधारणा, देखभाल व दुरुस्तीच्या कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. ग्राम विकास विभागात जिल्हा परिषद शाळांच्या बांधकाम, दुरुस्तीसाठी अनुदान देणेबाबतची योजना कार्यरत नाही. त्यामुळे जिल्हा विकास योजना (DPDC), वित्त आयोग, क्रीडा योजना, खनिकर्म, सी. आर. सी. फंड, खासदार स्थानिक विकास कार्यक्रम व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अशा सर्व योजनांतर्गत जिल्हा परिषद शाळांचे बांधकाम / इमारत विशेष दुरुस्ती / पुनर्बांधणी व जिल्हा परिषद शाळांच्या संबंधित मंजूर केलेली सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत अभियंत्याकडे सोपविण्यात आले आहे.

संदर्भित शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here