जाणून घ्या आपल्या PF खात्यातील शिल्लक! फक्त एका मिसकॉल किंवा मॅसेजवरून.

354

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आर्थिक अडचणीच्या वेळी आधार असतो तो आपल्या PF चा म्हणजेच भविष्य निर्वाह निधी चा. PF मधील रक्कम काढणे आता अगदी सुलभ झाले आहे. परंतु ती रक्कम काढण्याआधी आपल्या PF खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे जाणून घेणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्याला कार्यालय प्रमुखांकडे विचारणा करावी लागते. माहिती मिळण्यास विलंब झाला तर आपली नियोजित कामेही रखडण्याची शक्यता असते. परंतु आपल्या PF खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी आपल्याला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. आपण अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या आपल्या मोबाईल वरून फक्त एका मिसकॉल द्वारे किंवा SMS द्वारे आपल्या PF खात्यातील शिल्लक जाणून घेऊ शकतो.

👇खालील दोन प्रकारे आपण आपल्या PF खात्यातील शिल्लक जाणून घेऊ शकता.

1) SMS (मेसेज) द्वारे शिल्लक जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स Follow करा.

◆ आपल्या नोंदणीकृत (Regustered) मोबईल नंबरवरुन “EPFOHO”असे टाईप करा.

◆ EPFOHO च्या पुढे स्पेस देऊन आपला UAN म्हणजेच Universal Account Number टाईप करा.

◆ आता टाईप केलेला मेसेज 7738299899 या क्रमांकावर पाठवा.

★ ही सुविधा मराठी, हिंदी, पंजाबी, तमिळ, मल्यालम, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली आशा 10 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. इंग्रजी ही Default (आधी निवडलेली) भाषा असते.
आपल्याला आपल्या मातृभाषेत PF ची माहिती हवी असल्यास, आपल्या नोंदणीकृत मोबाईलनंबरवरुन EPFOHO UAN टाईप करुन आपल्या प्रादेशिक भाषेच्या नावातील पहिली तीन इंग्रजी अक्षरे टाईप करावित.
जसे, मराठीत माहिती हवी असेल तर EPFOHO UAN MAR टाईप करुन तो SMS 7738299899 नंबरवर पाठवावा.

2) मिसकॉल (Misscall) द्वारे शिल्लक जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स Follow करा.

◆ आपल्याला आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन मिसकॉल देऊनही PF खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल.

◆ यासाठी आपल्या मोबाईलवरुन 011-22901406 या नंबरवर कॉल करा.

◆ दोन रिंग वाजल्या की तुमचा फोन आपोआप कट होईल.

◆ आता काही क्षणात आपल्याला एक SMS मेसेज येईल, ज्यामध्ये आपल्या PF खात्यातील शिल्लक रकमेचा तपशील दिलेला असेल.

अशाप्रकारे अगदी सहज आपण आपल्या PF खात्यातील शिल्लक घरबसल्या जाणून घेऊ शकतो. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

— सतीश लाडस्कर,भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here