साराभाई टीचर सायंटिस्ट नॅशनल अवॉर्ड २०२१ साठी नामांकन अर्ज सुरू
शशिकांत इंगळे,अकोला
नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स सायंटिस्ट इंडिया ( भारत सरकार द्वारा चलित भारतातील विज्ञान आणि गणित शिक्षकांचा सर्वात मोठा मंच) तसेच ए.पी.जे. अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट इंडिया, रामन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन गुजरात (VIPNET अंतर्गत), विज्ञान प्रसार डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रथमच राष्ट्रीय पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील वैज्ञानिक शिक्षक यांना ‘साराभाई टीचर्स सायंटिस्ट नॅशनल अवॉर्ड २०२१‘ या नावाने गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार भारताचे थोर अंतराळ संशोधक वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांच्या आठवणीत देण्यात येत आहे.
त्याबद्दल सर्व शिक्षकांना शुभेच्छा.
◼️स्पर्धेच्या अटी आणि मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे:
१) शालेय इच्छुक शिक्षक विशेषता विज्ञान आणि गणितातील शिक्षण वेगवेगळ्या गटात सहभागी होऊ शकतात.
▪️ प्राथमिक शिक्षक वर्ग १ली ते ५वी.
▪️ उच्च प्राथमिक शिक्षक वर्ग ६वी ते वर्ग ८वी
▪️ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक वर्ग ९वी ते वर्ग १२वी
२) सर्व सहभागी उमेदवारांना त्वरित नामांकन ई-प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेमध्ये सहभाग ३१ जुलै २०२१ पर्यंत प्रथम फेरीत/पटलीमध्ये करावा लागेल.
३) स्पर्धा ३ पातळी/ फेरीमध्ये घेतली जाईल.
▪️प्रथम पातळी/ फेरी
दोन टप्प्यांमध्ये १००% गुणांसह गुंतागुंतीची निवड प्रक्रिया (६०+४०)
अ) ऑनलाइन नामांकन पद्धत:
इच्छुक शिक्षकांना त्यांचा गट निवडावा लागेल आणि विशिष्ट गटांचा ऑनलाइन गुगल फॉर्म निर्धारित कालावधीत भरून ऑनलाईन अर्ज भरून द्यावा लागेल. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पोस्ट केलेले किंवा ईमेल केलेले नामांकन स्वीकारले जाणार नाही.
४) राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाममात्र शुल्क रुपये १००/- प्रती उमेदवार भरावी लागेल.
◼️भरणा करण्यासाठी खालील बँक खात्यांचा वापर करावा.:
अ) खाते धारकाचे नाव:
रामण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन
खाते क्रमांक: 209310110003724
बँकेचे नाव : बँक ऑफ इंडिया
बँकेची शाखा: वाधवण GIDC, सुरेंद्रनगर, गुजरात
▪️ब) वरील खाते व्यवहाराचा (JPEG) इमेज फॉरमॅटमध्ये आम्हाला पुढील व्हाट्सअप नंबर 7875925170 वर उमेदवाराचे नाव आणि इतर माहिती पडताळणीसाठी पाठवा.
विस्तृत माहितीसाठी खालील माहिती pdf चे अवलोकन करावे