बदली झालीय? काळजी करू नका! ह्या सोप्या ट्रिकद्वारे आपल्या PF खात्यातील पैसे नव्या खात्यात ट्रान्सफर करू शकता.

461

सतीश लाडस्कर, भंडारा

नोकरी करत असताना आपल्याला बऱ्याचदा बदलीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. बदलीमुळे आपली ईपीएओमधील PF ची रक्कम नव्या खात्यात ट्रान्सफर करावी लागते. नव्या कंपनीत रुजू झाल्यानंतर आपल्याला जुन्या कंपनीच्या खात्यातील PF ची रक्कम नव्या खात्यात ट्रान्सफर करावी लागते. PF ट्रान्सफरची ही प्रक्रिया आता अगदी सुलभ झाली आहे. ऑनलाईन PF ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याकडे UAN अ‌ॅक्टिव्ह असणे, तसेच PF खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

★ इपीएफओ(EPFO)चे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी खालील स्टेप्स 👇 FOLLOW करा.

◆ सर्वप्रथम खालील लिंकद्वारे EPFO च्या यूनिफाईड मेंबर पोर्टल वर जा.
https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/

◆ आता यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.

◆ त्यानंतर Online Services हा पर्याय निवडा.

◆ आता Member-One EPF Account Transfer Request या पर्यायावर क्लिक करा.

◆ याठिकाणी आपली वैयक्तिक माहिती भरून PF खाते Verify करावे लागेल.

◆ यानंतर Get Details हा पर्याय निवडा.

◆ आता Online Claim Form ची पुष्टी करण्यासाठी मागील नियोक्ता आणि वर्तमान नियोक्ता यांच्या दरम्यान निवड करण्याचा पर्याय दिसेल. तुम्ही अधिकृत सिग्नेटरी होल्डिंग डीएससीच्या उपलब्धतेवर आधारित हे निवडले आहे. दोन मालकांपैकी कोणतेही निवडा आणि सभासद ID किंवा UAN द्या.

◆ यानंतर सगळ्यात शेवटी Get OTP या पर्यायावर क्लिक करा.

◆ आता आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल, तो OTP सबमिट करा.

◆ OTP Verify झाल्यानंतर कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रोसेससाठी Request जाईल.

◆ रिक्वेस्ट पाठवल्यापासून ही प्रक्रिया पुढच्या तीन दिवसांत पूर्ण होईल.

◆ प्रथम कंपनी आपले PF चे पैसे हस्तांतरित करेल. त्यांनतर EPFO चे फील्ड अधिकारी याची पडताळणी करतील.

◆ हस्तांतरण विनंती पूर्ण झाली की नाही हे पाहण्यासाठी आपण ट्रॅक क्लेम (Track Claim) या पर्यायावरून पैसे ट्रान्सफरची स्थिती तपासू शकतो.

ही प्रक्रिया करताना कर्मचाऱ्याचा EPFO खात्याचा UAN अ‌ॅक्टिव्ह असायला हवा. त्याचा मोबाईल नंबर रजिस्टर असायला हवा, तसेच आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर EPFO ला ही लिंक असायला हवा. अन्यथा EPFO तिल PF ची रक्कम जुन्या खात्यातून नव्या खात्यात जमा करताना अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर, कर्मचाऱ्याचे बँक खाते, आधार कार्ड हे सर्व UNA खात्याला लिंक असणे गरजेचे आहे.
अशाप्रकारे आपण जुन्या कंपनीतून नव्या कंपनीत आपले PF चे पैसे ट्रान्सफर करू शकतो.

जर आपल्याला ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करावयाची असेल तर हस्तांतरणासाठी आपल्याला फॉर्म 13 भरावा लागेल आणि आपल्या जुन्या किंवा नवीन कंपनीला द्यावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here