यापुढे नववी ते बारावी चे वर्षभर होणार मूल्यमापन!

357


शिक्षण विभागाचा निर्णय

हिंगणघाट: प्रभाकर कोळसे
गतवर्षीपासून देशासह राज्यात कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर औद्योगिक आर्थिक क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रही पुरते कोलमडले आहे.मागील सत्रात शाळा, महाविद्यालये कुलुपबंद च राहीलेत.विद्यार्थी आँनलाईन शिक्षण घेत असले तरी ते सर्व विद्यार्थ्यांपर्यत पोहोचले किंवा कसे हा खरं तर संशोधनाचा विषय होऊ शकतो.यंंदाही शाळा सत्र प्रारंभाची सुरुवात झाली तेही विद्यार्थी विनाच.
गत वर्षी शाळा बंद असल्याने तद्वतच राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने दहावी बारावीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात आणि शेवटी रद्दही करण्यात आल्यात. दहावीच्या परीक्षेचे मुल्यमापन सुत्र अखेर ठरले असुन राज्यातील शाळा शाळांमध्ये दहावीच्या मुल्यमापनाची लगबग सुरू झाली आहे .तर बारावीच्या परीक्षेचे मुल्यमापन सुत्र अद्याप ठरले नसल्याने बारावीच्या परीक्षेचा निकाल सद्या तरी थंड बस्तयातच आहे.यंदा दहावी बारावी परीक्षे बाबत निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे विविध परीक्षांच्या माध्यमातून वर्षभर मूल्यमापन करण्यात येणार आहे त्यामुळे यंदा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत होणाऱ्या वर्षभरातील परीक्षाही गांभीर्याने घ्याव्या लागणार आहेत.
@ परीक्षा शाळा स्तरावरच
विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी होणार, कशा होणार, किती गुणांच्या असणार त्याबाबतची नियमावली शिक्षण विभाग निश्चित करणार आहे मात्र प्रत्यक्ष परीक्षा शाळांना घ्यावे लागणार आहेत आणि मूल्यांकन ही करायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here