कोविड मुळे अनाथ झालेल्या बालकांच्या पालन-पोषण संदर्भातले धोरण तयार करा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश

183

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर: महिला व बालविकास विभागाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी covid-19 मुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांचे पालनपोषण संदर्भातला मोठ्या प्रश्नांवर गांभीर्याने कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या दोन्ही पालक किंवा दोघांपैकी एक अशा बालकांच्या पालन-पोषणापासून त्यांच्या शिक्षणापर्यंतचे फायदे त्यांना कसे उपलब्ध करून देण्यात येतील. या संदर्भातील नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. या नियोजनात बालरोग तज्ञांच्या टास्क फोर्समधील डॉक्टरांचा व महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांमध्ये विचारांची देवाण-घेवाण होवून यामध्ये बालकांना कोरोनापासून कशा प्रकारे प्रतिबंधित करण्यात करता येईल. यासंदर्भातली माहिती द्यावी व तसेच महिला व बालविकास विभागाचा अनुभव, ज्ञान व माहितीचे आदान-प्रदान होऊन त्या संदर्भातल्या प्रतिबंधात्मक उपायांचा मार्गदर्शक सूचनांमध्ये समाविष्ट करावे. असेही निर्देश यावेळेस मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी महिला व बाल विकास विभागातील विविध निधी, योजना, कार्यपद्धती यासंदर्भातील आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांकडे राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून त्यांच्या कुटुंबाचे सर्वेक्षण ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ अभियानांतर्गत झालेली आहे. व त्याची इत्यंभूत माहिती ही संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे. यामध्ये कमी वजनाची बालके तसेच बालकांची सविस्तर माहिती यामध्ये समावेशित आहे. अशा बालकांच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. असेही मुख्यमंत्री म्हणाले पोरके झालेल्या बालकांना आर्थिक मदत, कोरोना आजारामुळे आई-वडील दगावलेल्या बालकाच्या नावाने मुदत ठेव म्हणून ५ लाख रूपये ठेवण्यात यावी. बालकांना आर्थिक मदत म्हणून त्यावरील व्याज देण्यात यावे. अशी योजना आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या संदर्भातला प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महिला व बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी या संदर्भातला प्रस्ताव सादर केला आहे .

शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचे पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here