आता आधार कार्डची ऑनलाईन प्रिंट काढता येणार नाही, UIDAI ने केले जाहीर. PVC आधार कार्ड हा असेल नवीन पर्याय.

235

आधार कार्ड हे प्रत्येकासाठी महत्वाचा ओळखीचा पुरावा मानला जातो. प्रत्येक कार्यालयीन कामाकरिता आधार कार्ड हे सक्तीचे आहे. आपल्याला आधार कार्ड हे Unique Identification Authority of India (UIDAI) या संस्थेमार्फत तयार करून दिले जाते. UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या आधार कार्ड ची ऑनलाईन प्रिंट काढू शकत होतो. परंतु, आधार कार्डच्या ऑनलाईन प्रिंटबाबत UIDAI ने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे.
UIDAI ने आता मोठया आकाराची आधार कार्डची प्रिंट न देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील माहिती UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विट अकाउंट वरून दिली आहे. UIDAI ने ट्विट केले आहे, की यापुढे ग्राहकांना मोठ्या आकाराची आधार कार्ड ची प्रिंट बंद केली आहे. त्याऐवजी PVC आधार कार्ड देण्यात येणार आहे.
हे PVC आधार कार्ड क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या आकाराचे असणार आहे, ज्यामुळे ते हाताळण्यास अगदी सोपे असेल. याचा दर 50 रुपये निश्चित केला आहे. याशिवाय जर तुम्हाला आधारकार्ड फ्लेक्सिबल पेपर फॉर्मेटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ई-आधारकार्डही मिळवू शकता. याची प्रिंटेड कॉपी देखील आधारकार्डप्रमाणे वैध मानली जाईल.UIDAI ने आपल्या वेबसाइटवरून आधार कार्ड रिप्रिंट करण्याचा पर्याय देखील काढून घेतला आहे.

PVC आधार कार्ड कसे मिळवता येईल?

खाली दिलेल्या स्टेप्स follow करा आणि आपले PVC आधार कार्ड मिळवा.

◆ सर्वप्रथम, क्रोम बाऊजर वर जाऊन UIDAI ची वेबसाइट uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in टाईप करा.

◆ त्यानंतर आधार मिळवा या पर्यायावर क्लिक करा.

◆ आता ‘Order Aadhaar PVC Card’ हा पर्याय निवडा.

◆ आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.

◆आता पहिल्या रकाण्यात तुमचा आधार कार्ड नंबर, टाईप करा.

◆ दुसऱ्या रकाण्यात दिलेला कॅप्चा कोड किंवा सिक्युरिटी कोड जसाच्या तसा टाईप करा.

◆ आता send OTP वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर OTP येईल.

◆ आता आलेला OTP खालील रकाण्यात टाईप करा.

◆ जर तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड नसेल, तर “मोबाइल नंबर रजिस्टर नाही” असे लिहिले आहे त्या चौकटीत टिक मार्क करा.

◆ आता आपला मोबाईल नंबर टाका, ज्यावर तुम्हाला OTP येईल.

◆ OTP टाकल्यानंतर आपले आधारकार्ड दिसेल.

◆ यानंतर आपल्याला फ़ोन पे, गुगल पे, किंवा इतर कोणत्याही UPI द्वारे ऑनलाईन 50 रुपये शुल्क भरावे लागेल.

◆ आपण पेमेंट करताच आपली रिक्वेस्ट मान्य झाल्याचे नोटिफिकेशन् आपल्याला मेसेजद्वारे प्राप्त होईल.

◆ काही दिवसांनी पोस्टाद्वारे आपल्या पत्त्यावर आपले PVC आधार कार्ड घरपोच मिळेल.

—- सतीश लाडस्कर,भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here