शासनाच्या विविध कार्यालयात कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचा दिवसाचा १/३ कालावधी कार्यालयात व्यतित केला जातो. कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर व पोषक असल्यास त्यामुळे, त्यांची कार्यक्षमता वाढून त्याचा फायदा निश्चितपणे प्रशासनास व सामान्य जनतेस होतो. तसेच यामुळे प्रशासन उत्तरदायी, सुलभ, स्वच्छ, पारदर्शी आणि गतिमान बनण्यास मदत होते. या बाबींचा विचार करता राज्य शासनाच्या विविध यंत्रणातील राज्यस्तर ते तालुका स्तरावरील सर्व कार्यालयांचे आंतरबाहय रुप बदलून प्रशासनास गती देणे, प्रशासनात कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणणे आवश्यक आहे. राज्यातील प्रत्येक कार्यालय हे स्वच्छ, सुंदर व नीटनेटके असावे तसेच तेथील वातावरण नागरिकांसाठी सुलभ व कर्मचाऱ्यांसाठी काम करण्यायोग्य, प्रेरक, उत्साहवर्धक असावे यासाठी राज्यस्तर ते तालुका स्तरावर “सुंदर माझे कार्यालय” अभियान राबविण्याची बाब शासन स्तरावर आयोजित केले आहे
सविस्तर वृत्तासाठी खालील शासन निर्णयाचे अवलोकन करावे:-