डॉ.कमलादेवी आवटे ( उपसंचालक,SCERT, पुणे,महाराष्ट्र) यांनी साधला मनपा विद्यार्थ्यांशी मनमोकळा ऑनलाइन संवाद..!!

435

मनपा शिक्षिका कुंदा बच्छाव यांचा अधिकारी आपल्या भेटीला हा अभिनव उपक्रम


नाशिक:सध्या कोविड परिस्थितीमुळे शाळा बंद आहेत परंतु विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहावे म्हणून त्यांना ऑनलाइन मार्गाने अभ्यास दिला जात आहे. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र चालू आहे.या अंतर्गत नाशिक मनपा शाळा क्रमांक 18 आनंदवल्ली येथील शिक्षिका श्रीमती कुंदा बच्छाव यांनी आपल्या विद्यार्थ्यांना कोविड काळात घरी बसून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा व ऑनलाइन मार्गाने का असेना त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व या शिक्षणाचा त्यांच्या भविष्यासाठी चांगला उपयोग व्हावा या दृष्टीने अधिकारी आपल्या भेटीला हा उपक्रम त्या गेल्या वर्षभरापासून राबवित आहेत. आजवर विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्य करणारे अनेक क्लासवन अधिकारी जे MPSC ,UPSC परीक्षेद्वारे या पदावर आलेले असून आपले देशसेवेचे कार्य करत आहेत उदा. मा.अर्चना तांबे(उपायुक्त,महिला व बालविकास विभाग), मा.संगीता गायकवाड(शिक्षण सभापती,नाशिक)मा.पुष्पावती पाटील(शिक्षणसहाय्यक संचालक,नाशिक)
मा.रत्नप्रभा भालेराव (प्राचार्या,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,नाशिक), मा.सुनीता धनगर (शिक्षणाधिकारी, मनपा शिक्षण मंडळ,नाशिक),मा.योगेश सोनवणे (जेष्ठ अधिव्याख्याता, डाएट,नाशिक),मा.जगन्नाथ दरंदले,मा.संगीता महाजन ( अधिव्याख्याता, डाएट,नाशिक)मा.एकनाथ ठाणगे(Rto इन्स्पेक्टर,नाशिक),मा.अपूर्वा जाखडी(सल्लागार,नासा space center) यांनी या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधत स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले असून हे विद्यार्थी नक्कीच अधिकारी होतील असे कौतुक ही केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाईन संवादात डॉ.कमलादेवी आवटे (उपसंचालक, SCERT, पुणे,महाराष्ट्र) यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा व मार्गदर्शन पर संवाद साधला. तब्बल दीड – दीड तास चालणाऱ्या या संवादात डॉ.आवटे यांनी विद्यार्थ्यांना अधिकारी नक्की बना पण एक आदर्श माणूस बनायला विसरू नका ,आजच्या या शर्यतीत आपल्या लोकांना ,आपल्या मित्रमैत्रिणींना बरोबर घेऊनच पुढे वाटचाल करा असे मार्गदर्शन करत त्यांना पुढील शिक्षणात कधीही माझी मदत लागली तर मला फोन नक्की करा असेही विद्यार्थ्यांना सांगितले.
अशाप्रकारे एवढ्या कमी वयात विद्यार्थ्यांना एवढे मोठे मार्गदर्शन मिळवून देणारा असा अधिकारी आपल्या भेटीला या उपक्रमाचे उपक्रमाची संकल्पना असणाऱ्या कुंदा मॅडमचे मा.डॉ.आवटे मॅडम यांनी कौतुक केले. तसेच संपूर्ण कार्यक्रम हा विद्यार्थी होस्ट करत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे ही भरभरून कौतुक त्यांनी केले व हे विद्यार्थी नक्कीच भविष्यात मोठे अधिकारी बनतील असा विश्वासही व्यक्त केला. या कार्यक्रमात नाशिक मनपा शिक्षण अधिकारी मा.सुनीता धनगर तसेच डाएट नाशिक मधून मा,योगेश सोनवणे,मा.उर्मिला उशीर,मा.प्रल्हाद हंकारे व नाशिक जिल्ह्यातील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मा. कैलास ठाकरे ,सहशिक्षिका शिक्षिका वैशाली भामरे, पुनम भामरे यांचे सहकार्य मिळाले. तसेच मनपा व जिल्हा परिषदेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी झूम मीट वर तसेच लाईव्ह चालू असलेल्या फेसबुक कार्यक्रमातील श्रोत्यांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावून या अधिकारी संवादकांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here