सर फाऊंडेशन जिल्हास्तरीय नारीशक्ति सन्मान पुरस्कार जाहीर

244

सोलापूर(19) – स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरम च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील बारा कर्तृत्ववान शिक्षिकांचा जिल्हा स्तरीय नारीशक्ति सन्मान पुरस्कार 2021 देऊन गौरव करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा महिला समन्वयक अनघा जहागीरदार, जिल्हा समन्वयक राजकिरण चव्हाण व नवनाथ शिंदे यांनी दिली.

दि.23 मे 2021 रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता पुरस्कार चे ऑनलाइन वितरण होणार आहे.पुरस्कार वितरण जिल्हा परिषद सोलापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीप स्वामी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून एस सी ई आर टी पुणे उपसंचालक मा. विकास गरड, माजी शिक्षण उपसंचालक श्रीमती सुमन शिंदे, सोलापूर डायट प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. संजयकुमार राठोड, डायट मधील अधिव्याख्याता डॉ. क्रांती कुलकर्णी व श्रीमती सुलभा पुजारी हे उपस्थित राहणार आहेत. शिक्षिका म्हणून कार्य करत असताना शाळा स्तरावर विविध नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून अध्यापन, सामाजिक कार्यातील सहभाग व कोविड काळातील शैक्षणिक योगदान याचा विचार करून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सर फाऊंडेशन च्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या सन्मानाचा कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
सोलापूर च्या यावर्षी च्या पुरस्कार विजेत्यांमध्ये श्रीमती ज्योती पाटील, सिद्धेश्वर प्राथमिक शाळा, सोलापूर (सोलापूर शहर), डॉ. माधुरी भोसले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एकरूख (उत्तर सोलापूर ), श्रीमती सीमा तुळजापुरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाळूज (मोहोळ), श्रीमती सुप्रिया ताकभाते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडी (माढा), सौ. संध्या नाचणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नं.2, अकलूज (माळशिरस),श्रीमती वैशाली भोसले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाडगेमळा (सांगोला),सौ. रोहिणी वीर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कविटगांव (करमाळा), सौ. राजश्री कल्याण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लिंबीतोटी, नागणसूर (अक्कलकोट),श्रीमती गायत्री काळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मद्रे (दक्षिण सोलापूर), सौ. अश्विनी तावसकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरढोण (पंढरपूर),श्रीमती शिवकांता चिमदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुंजेगाव (मंगळवेढा),श्रीमती शकुंतला पालके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दहिटणे (बार्शी) या आहेत.
या निवडीबद्दल सर फाऊंडेशनचे महिला राज्य समन्वयक श्रीमती हेमा शिंदे, राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे व बाळासाहेब वाघ यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here