वार्ताहार:- बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांचे प्राप्त परिस्थितीशी जुळवणी करत अध्यापन करणे,भविष्यातील शिक्षण पद्धतीचा वेध घेत शिक्षकांना अधिक समृद्ध करणे आवश्यक आहे.यासाठी
आदिवासी विकास प्रकल्प किनवट व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या द्वारे दिनांक- 26 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत अदिवासी विकास विभागातील शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
या प्रशिक्षणात दिनांक 17 मे 2021 रोजी सकाळी 10 वाजता ‘ऑडीओ रेकॉर्डिंग,डबिंग,व्हाईस मॉड्युलेशन तंत्रज्ञान’या विषयावर जतीन कदम व प्रतीक्षा क्षीरसागर यांचे मार्गदर्शन होणार आहे.
17 मे 2021 दुपारी 12:00 वाजता
दिनांक 18 मे 2021 वेळ:- सकाळी 10:00 वाजता
दिनांक 18 मे 2021 वेळ:- दुपारी 12:00 वाजता
या प्रशिक्षणासाठी एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट येथील प्रकल्प अधिकारी मा. श्री किर्तीकिरण एच पुजार साहेब(प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी) व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेड येथील प्राचार्य डॉ.रवींद्र अंबेकर (प्राचार्य) यांनी विशेष प्रयत्न केले. शिक्षकांनी या उत्तम संधीचा लाभ घ्यावा असे कळविले आहे.