आदिनाथ सुतार,राजूर(अह.नगर)
वार्ताहर:-कोरोना विषाणूच्या सततच्या फैलावामुळे महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात राबविण्यात आले होते यात ऑनलाईन शिक्षणात शहरी मुलांचा सहभाग अधोरेखित झाला परंतु ग्रामीण भागातील काही मुलांना मात्र विविध सोयी सुविधा अभावी ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही.यात आश्रमशाळा मुलांच्या देखील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. तंत्रज्ञानाचा अभाव भौगोलिक प्रतिकूल परिस्थिती यामुळे ग्रामीण आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणातील संकल्पनांना खोडा बसला होता तरी देखील वर्कबुक, कार्यपुस्तिका व गृहभेटीतून आश्रमशाळा मुलांचे शिक्षण चालू होते.मात्र गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता महाराष्ट्रातील आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाकडून येणार्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी अनलॉक लर्निंग २ चे यशस्वी नियोज केलेले असून. आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे शिक्षण पोहचवण्यासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील असल्याचे विभागीय सुत्रांनी सांगितले.
अनलॉक लर्निंग २ चे वैशिष्ट्ये:-
१. शिक्षक मित्र ही संकल्पना राबवली जाणार.
२. १२ वी पास स्थानिक युवकांच्या माध्यमातून एकाच गावातील वेगवेगळ्या आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र करून नियमित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक मित्र युवकांच्या सहायाने वारंवार पाठपुरावा करून अभ्यास तयारी व स्वाध्याय सोडवून घेतले जाणार आहेत.
४. मुलभूत क्षमता विकासावर भर देऊन गणित,इंग्रजी,विज्ञान व आवश्यकते नुसार मराठी भाषेच्या विषयाचे अध्यापन देखील होणार आहे.
५.अनलाॅक लर्निग दोनसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याचा २ जूनपर्यंत पुरवठा होणार.
६. १५ जून पासून अनलॉक लर्निंग-२ सुरु होणार.
७. आश्रमीय कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे.