शशिकांत इंगळे,
वार्ताहार: देशात कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
परंतु आता दहावी सोबतच बारावीच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात याव्या अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता इयत्ता बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात याव्या. याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका वकील ममता शर्मा यांनी दाखल केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांच्या मनात देखील चिंताजनक वातावरण निर्माण होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या. अशा वेगवेगळ्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या. मात्र सीबीएसई बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द बाबतच्या निर्णयाला स्पष्ट नकार दिला आहे. बारावीच्या परीक्षा रद्द करणे. या विषयावर कोणताही निर्णय अधिकृतरित्या झालेला नाही. वर्ग बारावीच्या परीक्षा रद्द झाली ही निव्वळ अफवा आहे. असे सीबीएसई बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात शुक्रवार पर्यंत एक प्रसिद्धी पत्रक जारी केले जाईल. असे सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे.
बारावीच्या परीक्षांबाबत जो निर्णय घेण्यात येईल तो माध्यमांना अधिकृतरित्या कळविला जाईल. असेही सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आव्हान केले आहे. सीबीएसई बोर्ड विद्यार्थ्यांबाबत अधिकृत माहिती त्यांच्या वेबसाईटवर जाहीर करत असते. लेटेस्ट माहितीसाठी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. असे आवाहन सीबीएसई बोर्डाकडून करण्यात येत आहेत.