परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत.

460

दिनांक ०१.०४.२०१५ पासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना कार्यान्वित झाली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत कर्मचाऱ्यांना वेतनातून कपात झालेल्या अंशदानावर शासनाचे सममूल्य अंशदान देण्यात येते. सदरची अंशदाने निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरणाने नेमलेल्या निधी व्यवस्थापकामार्फत गुंतवणूकीसाठी उपलब्ध करुन देण्यात येतात. या रकमा कर्मचाऱ्यांचे योजनेचे सदस्यत्व, मृत्यु, सेवानिवृत्ती, राजीनामा इत्यादी कारणामुळे संपुष्टात आल्यावर निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरणाने ठरविलेल्या नियमानुसार वार्षिक योजना (Annuity Plan) मध्ये गुंतविण्यात येवून त्यावर कर्मचाऱ्यास / त्याच्या वारसास मासिक निवृत्तीवेतन विषयक लाभ देण्याची तरतूद आहे. परंतु मृत्यु झाल्यास सद्यस्थितीत कोणतीही वार्षिक योजना (Annuity Plan) कार्यान्वित नसल्याने कर्मचाऱ्यास त्याच्या खात्यावर जमा झालेला सर्व संचित निधी दिला जातो.

शासन निर्णय तसेच वारसदार,कार्यालय प्रमुख व प्रशासकीय अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही आणि आवश्यक जोडपत्रे व वरसदाराने सानुग्रह अनुदान मागणीसाठी करावयाचा अर्ज pdf डाउनलोड करण्यासाठी:-

संकलन- भुपेंद्र पाटील,जळगाव

◼️महाराष्ट्र शासन, शुद्धीपत्रक
दिनांक- 30 एप्रिल 2021

आकस्मिक आजारांमध्ये कोविड-१९ या नविन आजाराचा समावेश करणेबाबत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here