तुमचं Facebook Profile कोणी तपासतंय का? चला जाणून घेऊया, कोणी कोणी बघितलंय आपलं fb प्रोफाइल.

229

खाली दिलेल्या टिप्स follow करा आणि जाणून घ्या.

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात तसेच इतरही वेळी आपण आपली फावली वेळ सोशल मीडियावर (Face book, Whatsapp, twitter आणि इतर) घालवत असतो. काही बोटावर मोजता येतील एवढेच लोक असतील, कि जे Facebook चा वापर करत नसतील. तर काही लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालंय हे फेसबुक (Facebook).
लॉकडाऊन काळात तर फेसबुक आणि एकंदरच सोशल मीडिया वापरात मोठी वाढ झाली. लोकांचे विविध बाबतीतील मतप्रवाह, जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी फेसबुक चा वापर केला जातो. एवढेच नव्हे तर, बऱ्याच नावाजलेल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या उमेदवारांची मुलाखतीवेळी, जोडलेल्या प्रोफाइलबरोबरच फेसबुक प्रोफाइल्सही चेक करतात. त्यावरून संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज बांधला जातो. लग्न किंवा इतर अनेक कारणांसाठीही फेसबुक प्रोफाइल्स तपासून पाहणं आता क्रमप्राप्त झालं आहे..

असे असले तरी, काही समाजकंटक आपल्या profile वरील माहितीचा दुरुपयोगही करू शकतात. म्हणूनच फेसबुकवर आपला कोणी पाठलाग करत आहे का, आपली माहिती काढून कोणी तिचा गैरवापर करतोय का, हे समजण्यासाठी काही सुविधा असावी असे आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असेल.

आपल्या Facebook प्रोफाइल कोणी पडताळून पहिली, हे शोधून काही पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या कोणत्या फेसबुक फ्रेंड्सनी तुमच्या फेसबुक प्रोफाइलला भेट दिली हे शोधून काढता येणं शक्य आहे.

Apple (iOS) वापरकर्त्यांना त्यांचं (Facebook Profile) कोणी पाहिलं, हे त्यांच्या Privacy Setting मधून शोधता येतं.

अन्य androide वापरकर्त्यांना आपलं प्रोफाइल कोण बघतोय हे जाणण्यासाठी डेस्कटॉप कॉम्प्युटर वर facebook. com ही साईट ओपन करूनच ते पाहता येणं शक्य आहे.

आपली फेसबुक टाइमलाइन (Facebook Timeline/ profile) कुणी पाहिली, हे खालील स्टेप वापरून आपण चेक करू शकतो.

1. Apple (iOS) युजर्स साठी:

सर्वप्रथम फेसबुक सेटिंग्ज ओपन करावी.

त्यानंतर प्रायव्हसी शॉर्टकट्समध्ये जावं.

तिथे “Who viewed my profile” हा पर्याय दिसेल.त्यावर क्लिक करून आपण आपली प्रोफाइल कोणी कोणी बघितली ते जाणून घेऊ शकतो.

फेसबुकने आयओएस युजर्ससाठी हा पर्याय 2018 मध्ये खुला केला.

2. अँड्रॉइड (Androide) युजर्ससाठी :

सर्वप्रथम डेस्कटॉपवरून (Facebook.com) या वेबसाइटला भेट द्या.

या वेबसाइटवर गेल्यावर आपल्या facebook अकाउंट ला ( Log in ) लॉगिन करा.

त्यानंतर होमपेजवर कुठेही माऊसने राइट क्लिक करा.

त्यानंतर दिलेल्या पर्यायांपैकी (View Page Source) हे ऑप्शन निवडा.

त्यानंतर फेसबुक होम पेजचा सोर्स कोड (Source Code) ओपन होईल.

त्यानंतर search bar वर “BUDDY_ID” हे सर्च करावं.

“BUDDY_ID” या प्रत्येक टॅगच्या पुढे 15 अंकी संख्या दिसेल. हा 15 अंकी आकडा म्हणजेच आपल्या facebook प्रोफाईलला भेट दिलेल्या व्यक्तीचा प्रोफाइल आयडी असतो.

आता तो 15 आकडी आयडी कॉपी करावा.

त्यानंतर ब्राउझरमध्ये नवीन टॅब ओपन करा.

search bar वर facebook.com/ असं टाइप करून त्यापुढे तो 15 आकडी प्रोफाइल आयडी पेस्ट (paste) करा. आणि त्यानंतर एंटर बटण दाबा.

Enter बटन दाबताच त्या व्यक्तीचं fb प्रोफाइल ओपन होईल, ज्याने तुमच्या प्रोफाइलला भेट दिली होती.

—– सतीश लाडस्कर,पवनी,भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here