हिंगणघाट (२८/४):- कोरोना संसर्गाचे वाढत्या प्रादुर्भावामुळे ई १० ची परीक्षा रद्द करण्यात आली तर १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे मात्र इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा नियोजित वेळेवर होणार असल्याचे वृत आहे.
सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळ (सीबीएसई) आणि आयसीएसई अशा मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे देश आणि राज्य पातळीवर होणाऱ्या स्पर्धा परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. असे असले तरी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा नियोजित वेळेत २३ मे ला होणार आहे .
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारीत शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. कोरोनामुळे यंदा ही परीक्षा फेब्रुवारीएवजी २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती २३ मे रोजी होईल, असे सांगण्यात आले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण सहा लाख २८ हजार ६३० विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. यामध्ये दोन लाख ४२ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी पाचवीच्या, तर तीन लाख ८६ हजार ३२८ विद्यार्थ्यांनी आठवीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यातील ४७ हजार ६१२ शाळांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर मागील वर्षी मार्च महिन्यात राज्य लाकडाउन झाल्याने राज्याचे औद्योगिक क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रही पुरते कोलमडले.बाराची परीक्षा आटोपली होती तर दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता.विद्यार्थ्याना सरासरी गुण देण्यात आले.पहिली ते नववी, अकरावी च्या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात उन्नत करण्यात आले.यंदाची तीच हे परिस्थिती निर्माण झाली.दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली तर बारावी ची परीक्षा सध्या तरी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.दरम्यान राज्यात कोरोना संसर्गाचे वाढत्या प्रादुर्भावामुळे ५ वी ८ वी चे शिष्यवृत्ती परीक्षे नियोजित वेळेत होणार असल्याचे वृत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी तसे परीक्षेचे पुर्ण नियोजनही केले आहे.
–प्रभाकर कोळसे
हिंगणघाट