मी तुमची शाळा बोलतेय……कवी दंगलकार नितीन चंदनशिवे.

320

दंगलकार नितिन चंदनसिवे हृदयस्पर्शी काव्यरचना करणारे कवी म्हणून सर्वपरिचित आहेत.सदर कवितेत सुद्धा त्यानी अश्याच एका शैक्षणिक विषयाला हात घातलेला दिसून येतो.कोरोना महामारीच्या काळात सर्व शाळा बंद आहेत.विद्यार्थ्यांवाचुन शाळा सुन्या सुन्या झाल्या आहेत.शाळेतील शिक्षण बंद आहे.एकेकाळी विद्यार्थ्यानी गजबजून गेलेली शाळा आज नैरश्यानी निपचित पडलेली आहे आणि ही निपचित पडलेली शाळा जर बोलू लागली तर……..आणि त्या निपचित पडलेल्या शाळेला कविनी खरोखर जिवंत केल आहे.तिच दुख एकाकीपण त्यांनी अत्यंत हृदयद्रावक पध्दतिने काव्यरूपात मांडलेलं दिसून येतं.

शाळेने अत्यंत पोटतीडकिने विद्यार्थ्याना स्वत:कडे येण्याची साद घातली आहे.यातुन कवीला शिक्षणाबद्दल किती तळमळ आहे हे दिसून येते,कवी भावनीकतेची प्रचीती होते. आपण कोरोनाला हारऊ..अन  नव्याने शाळा सुरु होईल असा विश्वास पण कवी बोलून दाखवतात.यातुन कवी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देतात.….शब्दांकन-सोमनाथ गायकवाड(सोमविश्वा)

संपूर्ण कविता व्हिडिओ स्वरुपात बघण्यासाठी  👇👇

भिंती मुक्या झाल्यात

फळा रुसलाय रे

खडू उमटलाच नाहीय कित्येक काळ

ताटातूट झालीय सगळ्यांची

डस्टर पाहतोय एकटक कुठेतरी

मला ओळखलं ना?

हो माझ्या बाळांनो

मी तुमची शाळा बोलतेय

मला तुमची खूप आठवण येतेय…..

✒️कवी दंगलकार नितीन चंदनशिवे.

मु.पो.कवठेमहांकाळ.जि.सांगली.7020909521(व्हाट्सअप साठी.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here