जाणून घेऊ गुगल च्या काही गंमतीशीर ट्रिक्स

488

 गुगल च्या काही गंमतीशीर ट्रिक्स 

मित्रांनो ‘गुगल’ हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय वापरले जाणारे सर्च इंजिन आहे.या कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्निया ,अमेरिका येथे आहे.कंपनीची स्थापना ७ सप्टेंबर १९९८ रोजी झाली.’गुगल’ या नावाचा एक रंजक इतिहास आहे, तो तुम्ही विकिपीडियावर बघू शकता.त्याच्या नावाच्या रंजकतेप्रमाणेच त्याचे काही रंजक ट्रिक्स ही आहेत.ते आपण आजच्या टेक्नो टिप्स मधून जाणून घेऊयात….

१)Google underwater search :- गुगल सर्च बार मध्ये Google underwater search असे टाईप करून सर्च करा.येणारी विंडो ही पाण्याखालील पृष्ठभागावर असल्याची भासते.तिथे अनेक मासे सर्च बॉक्स च्या भोवतली फिरतांना दिसतील.

२)Google mirror:- हा शब्द सर्च करा.या सर्च बॉक्स मधून शोधलेली कोणतीही माहिती ही आरश्यातील प्रतिबिंब दिसेल.म्हणजे सर्व अक्षरे उलटे दिसतील.ते वाचायचे असेल तर आरश्यात बघून वाचावे लागेल.

३)सर्च बार कॅलक्युलेटर  :- आपण गणिती आकडेमोड करतांना कॅलक्युलेटर चा उपयोग करतो.त्याएव्हजी गुगल सर्च बार मध्ये एखादे गणित मांडा,त्यात अपेक्षित गणिती क्रियेचे चिन्हे असायला हवीत व शेवटी = हे बरोबर चिन्ह प्रेस करा,आपले उत्तर हजर.

४)संख्या वाचन-सर्च बार मध्ये कितीही मोठी संख्या टाका व त्यानंतर = हे बरोबर चे चिन्ह टाकून पुढे english असे लिहून सर्च करा,ती पूर्ण संख्या अक्षरात लिहून सादर होईल.

क्लिक करा: जुना मोबाईल विकण्या अगोदर हे नक्की करा.

५)सणांची माहिती :-विविध सणांच्या तारखा आठवत नसतील तर फक्त त्या सणाचे नाव वर्ष सर्च बार मध्ये टाका,इंटर मारा तारीख व वार हजर.

६)गुगल वेदर :- म्हणजे हवामान दर्शक ,तुम्ही एखाद्या शहराचे नाव व त्या पुढे weather असे लिहून सर्च करा.तुम्हाला त्या शहराचे संपूर्ण हवामान दर्शविण्यात येईल.

७)कॉपीराईट मुक्त इमेजेस :-बऱ्याचदा आपल्याला युट्युब वर लावण्यासाठी किंवा इतर ppt किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी गुगल वरून इमेज हवे असतात पण त्या इमेज ला लोगो किंवा इतर मार्क लावलेले असतात. ते परवानगीशिवाय इतरत्र वापरले गेले तर कॉपी राईट चा गुन्हा दाखल होऊ शकतो.यासाठी कॉपीराईट मुक्त इमेजेस ही गुगल वर शोधता येतात.त्या शोधण्यासाठी एखादी इमेज सर्च केल्यावर एकदम डाव्या कोपऱ्यात सेटिंग च्या बाजूला टूल्स हा पर्याय दिसतो त्यावर क्लिक करून Labeled for reuse with modification हा पर्याय निवडा.यानंतर येणाऱ्या सर्व इमेजेस ह्या मार्क नसलेल्या व कॉपीराईट मुक्त इमेजेस असतील.

क्लिक करा:- मोबाईल चे स्टोरेज फुल्ल झाले काळजी करू नका, मेमरी कार्ड न घेताही स्टोरेज होईल उपलब्ध

८)मुव्ही सर्व :- गुगल वर एखादा चित्रपट शोधताना आपल्याला या साईटवरून त्या साईटवर असे बरेच फिरवले जाते.काही वेळेस जाहिराती करत भलत्याच ठिकाणी पोहचवले जाते.हे टाळण्यासाठी गुगल सर्च बार मध्ये त्या चित्रपटाचे नाव व पुढे google drive असे लिहून सर्च करा. google drive वर जतन केलेले चित्रपट तुम्ही सहज शोधून बघू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here