टेक्नो टिप्स:- मोबाईल चे स्टोरेज फुल्ल झाले काळजी करू नका, मेमरी कार्ड न घेताही स्टोरेज होईल उपलब्ध

257

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आहे क्लॉउड स्टोरेज जिथे आपण 15 GB पर्यंतचा डेटा ठेवू शकतो सुरक्षित.सुरक्षीत यासाठी म्हणतोय की मोबाईल जरी हरवला खराब झाला तरी इमेल व पासवर्ड च्या साह्याने दुसऱ्या डिव्हाईस वरून सर्व बॅकअप परत घेऊ शकतो. या अॅप चे नाव आहे ‘गुगल ड्राइव्ह ‘ हे बहुतेक सर्व अँड्रॉईड मोबाइल मध्ये इनबिल्ट असतेच फक्त तिथे डेटा कसा फीड करावा हे आपल्याला माहीत नसते. तिथे आपलेफोटो,व्हिडिओ,डॉकूमेंट सेव्ह करण्यासाठी सर्व प्रथम गुगल ड्राइव्ह ओपन करा. त्यानंतर तळाशी एक बेरजेचे चिन्ह दिसते त्यावर क्लिक करा. तिथे आपणास फोल्डर,अपलोड,स्कॅन व इतर पर्याय दिसतील यातील फोल्डर हा पर्याय निवडा. तुम्ही कोणता डेटा भरणार आहात (फोटो, व्हिडिओ,pdf) त्याचे नाव लिहा व क्रिअट करा. त्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला तुमचे आता बनवलेले फोल्डर दिसेल. त्यावर क्लिक करा. परत खाली बघा बेरजेचे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.आता अपलोड हा पर्याय निवडून आपल्याला हवी ती pdf,फोटो,व्हिडिओ सिलेक्ट करा. आपला डेटा अपलोड होत असेल किंवा रेंज मुळे व्यत्यय आला तर आपल्या त्या फोटो/pdf पुढे अपलोड चा वरच्या दिशेने बाण दिसेल त्यावर क्लिक करा. काही क्षणात मोडीफाईड असे दिसेल. बस्स झाले आपले डॉकूमेंट सेव्ह आता जे अपलोड केले ते आपल्या मेमरी मधून डिलीट करण्यास हरकत नाही ते गुगल ड्राइव्ह वर सुरक्षित आहे. आपण ड्राइव्ह वरून त्याला कधीही डाउनलोड करू शकता.
या पद्धतीने आपल्या मोबाईलच्या मेमरी कार्ड वरील भार सहज कमी करता येऊ शकतो व अप्रत्यक्षरीत्या मोबाईल चा कार्यकरण्याचा स्पीड वाढवता येतो.
या अॅपची लिंक खाली दिलेली आहे.
(#हे अॅप प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल मध्ये इनबिल्टच असते)

https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.docs&hl=en_US

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here