मोठी बातमी:- राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश, परीक्षा रद्द

354

इयत्ता पहिली ते आठवीच्या परिक्षे संदर्भात शालेय शिक्षण मंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून महत्वपुर्ण घोषणा केली आहे.

देशातील व राज्यातील वाढता कोरोना संसर्ग पाहता विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून परीक्षा घेणे शक्य नसल्याने व ऑनलाईन बाबतीत ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणी लक्षात घेत RTE कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशीत करण्यात येणार आहे.

 

वर्षभरापासून शाळा बंद आहेत,काही ठिकाणी काही वेळेपर्यंत ऑफलाईन तर काही ठिकाणी पूर्णतः ऑनलाईन शिक्षण चालू असतांना परीक्षा कशा घ्याव्यात हा मोठा संभ्रम शिक्षकांना होता तो आता शिक्षण मंत्र्याच्या घोषणेने दूर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here