एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स मध्ये शिक्षक, कर्मचारी मोठीभरती

517

अतुल पवार,नाशिक:- भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था नोंदनिकृत: राज्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स (EMRS) साठी पुढील पदांच्या भरती प्रक्रियेकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवत आहे :प्राचार्य, उपप्राचार्य, PGT, TGT 

ऑनलाइन अर्ज, शैक्षणिक पात्रता, अध्यापन अनुभव (आवश्यक तिथे),आणि ETSSE-2021 च्या इतर पात्रता निकषा विषयी अधिक माहिती खालील संकेत स्थळावर उपलब्ध असेल

https://recruitment.nta.nic.in

पात्र व इच्छुक उमेदवार दिनांक 30.05.2021 ( 23:50 वाजेपर्यंत) उपरोक्त संकेतस्थळावाऱ ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून तसेच अर्ज व नमूद परीक्षा शुल्क भरून अर्ज सादर करू शकतात.
राज्य निहाय रिक्त जागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्या त्या राज्यातील रिक्त जागांसाठी संबधितीत राज्याचे रहिवासी असलेल्या उमेदवारांनाच अर्ज करता येईल
अद्ययावत माहिती साठी उमेदवारांनी

https://recruitment.nta.nic.in

https://recruitment.nta.nic.in/WebinfoEMRSRecruitment/Page/Page?PageId=5

वरील संकेतस्थळास वेळोवेळी भेट देणे आवश्यक आहे

 जाहिरात:-

अधिक सविस्तर माहितीसाठी इन्फॉर्मेशन बुलेटिन डाऊनलोड करा:- https://drive.google.com/file/d/19GufGhk6gSpk2pC1S_6DrYV2Ga_7tKYe/view?usp=drivesdk

 

एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कूल (ईएमआरएस ) बाबत:-

भारतीय समाजात सर्वाधिक उपेक्षित अशा अनुसूचीत जमातीच्या सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासाकडे अधिक सुव्यवस्थित व नियोजित पद्धतीने लक्ष केन्द्रित करण्याच्या उद्देशाने आदिवासी कार्य मंत्रालयाची स्थापना १९९९ मध्ये करण्यात आली.
स्थापनेपासूनच संपूर्ण देशातील आदिवासींच्या सर्वंकष उत्थानासाठी विविध उपक्रम राबविण्यात हे मंत्रालय सतत पुढाकार घेत आहे.या सर्व उपक्रमांत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरविणे या बाबीवर मंत्रालयाने विशेष लक्ष दिले आहे.कारण शैक्षणिक विकास हा सामाजिक आर्थिक विकासातील एक महत्वाचा मैलाचा दगड मानला जातो तसेच तो समाजाच्या सर्वांगीण साक्षमिकरणासाठी सर्वाधिक परिणामकारक साधन आहे.

ईएमआरएस ची उद्दिष्ट्ये :-

देशाच्या सर्व प्रदेशात व अधिवासांत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी गुणवत्तापूर्ण निवासी शाळा स्थापन करण्याच्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स ची स्थापना केली जात आहे .ईएमआरएस या योजनेत, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स, एकलव्य मॉडेल डे बोर्डिंग स्कूल्स तसेच सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर स्पोर्ट्स यांचा समावेश होतो. दुर्गम प्रदेशातील अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण उपलब्ध करून त्यांना शिक्षणातील सर्वोत्तम संधि उपलब्ध करून देणे व समाजाच्या मूळ प्रवाहात सामील होण्यासाठी त्यांना सक्षम करणे हे त्यामागील उद्दीष्ट आहे.

ईएमआरएस ची पर्यवेक्षकीय यंत्रणा:-

ईएमआरएस चा केंद्रस्तरीय नियंत्रण कक्ष – नॅशनल एड्युकेशन सोसायटी फॉर ट्राईबल स्टूडेंट्स (एनईएसटीएस): आदिवासी विकास कार्य मंत्रालयांतर्गत एनईएसटीएस ही एक स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली आहे. शाळा स्थापना, संवर्धन,देखरेख ,नियंत्रण व व्यवस्थापन तसेच राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया त्या राज्यातील आरक्षणाच्या अनुशेषा प्रमाणे स्वायत्त संस्थेमार्फत राबविणे इत्यादि कामे ही संस्था पाहते.

राज्य स्तर – राज्य सरकार:
राज्य सरकार ईएमआरएस/ईएमडीबीआरएस / सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर स्पोर्ट्स यांच्या विकास व विस्तारासाठी तसेच तत्संबधीच्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी विनामूल्य जमीन प्रदान करतात व त्या संबंधीच्या अडचणी दूर करतात.
राज्य सरकारने शालेय विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेला धोकेदायक वाटणार्‍या कायदा व सुव्यवस्था प्रश्नांवर तोडगा काढून शाळा , मुले, व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठीच्या उपाय योजना करणे आवश्यक असते.

राज्य स्तर :- राज्य ईएमआरएस सोसायटीज
राज्य पातळीवर एनईएसटीएस ने ठरविलेल्या निकष व मार्गदर्शक सुचनांनुसार विशिष्ट राज्यात मंजूर / स्थापित शाळांच्या व्यवस्थापणासाठी राज्य ईएमआरएस ची स्थापना करण्यात येते. या राज्य स्तरीय संस्था त्या राज्यातील ईएमआरएस आणि त्यातील कर्मचारी यांच्या प्रशासनास जबाबदार असतात तसेच एनईएसटीएस ने नेमून दिलेल्या इतर जबाबदर्‍या त्यांना पार पाडाव्या लागतात.
जिल्हा स्तरीय संस्था ( फक्त देखरेखीसाठी ): जिल्हा पातळीवरील कमिटीची निर्मिती जिल्ह्यातील शाळांच्या कार्यप्रणालीचे पर्यवेक्षन करण्यासाठी करण्यात यावी. जिल्हाधिकारी हे कमिटीचे अध्यक्ष तर शाळांच्या कार्यप्रणालीचे पर्यवेक्षन कण्यासाठी व त्यांची कार्यप्रणाली अधिक प्रभावी असण्यास मदत व्हावी यासाठी स्थानिक शिक्षण तज्ञ तसेच जिल्ह्यातील आदिवासी प्रतींनिधी व अधिकारी हे सदस्य असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here