सन २०२०-२१ या वर्षाची सर्व शाळांची माहिती यु-डायस प्लस या ऑनलाईन प्रणालद्वारे संगणकीकृत करणेबाबत मार्गदर्शक सूचना

502

भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी विकसित केलेल्या यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती राज्य / जिल्हा / महानगरपालिका / तालुका / शाळास्तरावरुन ऑनलाईन पध्दतीने दि. ३० सप्टेंबर, २०२० या संदर्भिय दिनांकानुसार यु-डायस प्लस प्रणालीमध्ये

दि. ३१ मे, २०२१ पर्यंत राज्यातील शाळांची माहिती ऑनलाईन पध्दतीने संगणकीकृत करण्याकरिता कळविले आहे.

देशामध्ये कोविड १९ चा प्रादूर्भाव असल्याने लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली आहे त्यामुळे राज्यातील शाळा ऑनलाईन पध्दतीने सुरु आहे सन २०२१-२२ समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता जिल्ह्यातील शाळांची अद्यावत माहितीची आवश्यकता आहे. कोविड १९ चा विचार करता भारत सरकारकडून सन २०१९-२० या वर्षामध्ये विकसित केलेल्या प्रपत्रानुसार सन २०२०-२१ च्या प्रपत्रामध्ये काहीही बदल न करता शाळांमध्ये उपलब्ध झालेल्या सोयीसुविधांची, शिक्षक, विद्यार्थी, मोफत पाठपुस्तके, गणवेश, दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयीसुविधांची माहिती ऑनलाईन पध्दतीने यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहे ३१ मे, २०२१ पर्यंत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अद्यावत करुन पुर्ण करणे आवश्यक आहेे.

काय आहे UdisePlus प्रणाली:-

Unified District Information System for Education (U-DISE Plus), जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली भारत सरकारमार्फत ऑनलाईन पध्दतीने कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या प्रणालीद्वारे राज्यातील इयत्ता 1ली ते 12वीं पर्यंत शिक्षण देणार्या सर्व व्यवस्थापनाच्या, माध्यमांच्या अभ्यासक्रमांच्या (C.B.S.E.,I.C.S. E., I. B., IGCSE, State Board, other इत्यादी), अनधिकृत, मान्यता नसलेल्या शाळांची माहिती संकलित करून संगणकीकृत करण्यात येते. अंतिम केलेली माहिती जिल्हास्तरावरून शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) जिल्हा परिषद यांच्यामार्फत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयास सादर करण्यात येते. सन 2018-19 या वर्षापासून राज्यातील सर्व शाळांची माहिती www.udiseplus.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करून अंतिम झालेली माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामार्फत प्रमाणीत करून राज्याची माहिती भारत सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. अंतिम झालेल्या यू-डायस प्लस माहितीनुसार भारत सरकारकडून PGI निर्देशांक व निती आयोगाकडून SEOI निर्देशांक निश्चित करण्यात येणार आहे.

> उद्दिष्ट:

राज्यामधील सर्व शाळांच्या माहितीचा उपयोग शाळा तपशील, विद्यार्थी संख्या, दिव्यांक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, शाळा अनुदान, भौतिक व मूलभूत सुविधा, व्यवसायिक शिक्षण इत्यादी शाळांची गुणवत्ता वाढविण्याकरिता व समग्र शिक्षा या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता अत्यंत महत्त्वाची आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अधिनियमाची अंमलबजावणी करण्याकरीता अत्यंत महत्त्वाची आहे.

> अधिक माहितीसाठी

राज्य :- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, जवाहर बालभवन, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड मुंबई 400 004. दूरध्वनी क्रमांक 022-23679278, 022-23636314 (Ext No. 219, 228), मोबाईल नं./व्हॉट्स अॅप नं.: 9323338543, 8652389710. ई-मेल: mpspmah@gmail.com,

जिल्हा/महानगरपालिका/तालुका:-शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक ). जिल्हा परिषद / महानगरपालिका /तालुका

भारत सरकारचे U-DISE Plus संकेतस्थळ : http://udiseplus.gov.in

या संदर्भातील पत्र डाउनलोड करा:-

https://drive.google.com/file/d/16RdXgwXeJAUP3B4ufqKsc99MHT1MNNSR/view?usp=drivesdk

शाळा माहिती भरण्यासाठी udise plus कोरे प्रपत्र डाउनलोड करा:-

https://drive.google.com/file/d/16Ml_2DLT3nMW2XQFWdscxo5oUSzphYan/view?usp=drivesdk

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here