इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा आता २३ मे रोजी.

425

परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दिनांक २५ एप्रिल, २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली होती. तथापि सदर परीक्षा दि. २३ मे, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता शाळांना दि. ३० मार्च, २०२१ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तथापि त्याकरीता दि. १० एप्रिल, २०२१ पर्यंत द्वितीय मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. १० एप्रिल, २०२१ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here