टेक्नो टिप्स:- फोटो रिसाइझर द्वारे फोटोची साईझ कमी करणे

335

Photo Resizer

नितीन केवटे:-मित्रांनो नौकरी फॉर्म भरतांना किंवा शाळेत स्कॉलरशिप/ नवोदय विद्यालय चे प्रवेश फॉर्म भरतांना पासपोर्ट फोटो अपलोड करण्यास सांगितले जाते.हा फोटो अपलोड करतांना खाली एक सूचना दिलेली असते फोटो इतक्या -इतक्या केबी (kb)च्या आत असावा. ही सेटिंग तो फॉर्म तयार करणाऱ्याने आपल्याकडे कमीत कमी साईझ मध्ये डाटा एकत्रीत व्हावा या उद्देशाने केलेली असतो.त्यांच्या कडे हजारो लाखो फॉर्म भरणाऱ्यांचा डाटा साठवत असतो.ही साठवण क्षमता मर्यादित स्वरूपात असावी म्हणून ते फोटो अपलोड साठी कमीत कमी साईज चे एक्सेस सेट करतात. कमी साईज मध्ये फोटो अपलोड करावा हे अनिवार्य केलेले असते. परंतू आपल्याला ते जमत नसल्याने आपली गैरसोय होते.सर्व फॉर्म भरता येतो पण नेमकी येथेच अडचण येते.
तर आज आपण बघणार आहोत फोटो ची साईज कशी कमी करावी.
प्ले स्टोअर वरून photo Resizer हे अॅप डाउनलोड करा.
अॅप उघता आपल्यासमोर select photo, take photo, file mode हे तीन पर्याय दिसतील. यातील पहिला पर्याय हा गॅलरीतून फोटो घेण्यासाठी आहे.दुसरा पर्याय क्लिक करताच कॅमेरा उघडतो म्हणजे फोटो काढून त्याची साईज कमी करण्यासाठी, तिसरा पर्याय हा फाईल मॅनेजर चा आहे.तुम्ही ज्या फोटोची साईज कमी करणार आहात तो कुठे आहे यावर कोणता पर्याय वापरवा हे ठरते.गॅलरीत पासपोर्ट आहे असे समजून पहिला पर्याय निवडा – गॅलरी ओपन होईल-पासपोर्ट निवडा-आता फोटो ची साईज कमी करतांना कोणत्या पिक्सेल मध्ये तो फोटो असावा अशी विचारणा होते .आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरत आहोत त्यांनी ज्या पिक्सेल ची मागणी केली तो पर्याय निवडा किंवा तशी मागणी केली नसेल तर सर्वसाधारणपणे वापरले जाणारे 800बाय 600 हा पर्याय निवडा-क्षणात आपल्या पासपोर्ट ची साईज किती कमी झाली हे दर्शवले जाते.किती टक्के कमी झाली हे देखील कळते. जिथे फॉर्म भरत आहात त्यांच्या मागणी एव्हढा किंवा त्यापेक्षा कमी साईज झाली तरी आता हा पासपोर्ट त्या फॉर्म मध्ये अपलोड करता येईल.
धन्यवाद…!
या अॅपची लिंक खाली दिलेली आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.xllusion.app.photoresizer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here