नाशिक:-आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे अधिनस्त कार्यालयातील एकूण ९,४२३ अस्थायी पदांना संदर्भाधीन क्र. १ च्या शासन निर्णयान्वये दि. ०१.०९.२०२० ते दि.२८.०२.२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सदर मुदत संपल्यामुळे आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी संदर्भ क्र.२ अन्वये प्रस्तावित केल्यानुसार, वित्त विभागाच्या संदर्भ क्र.३ येथील आदेशान्वये प्रशासकीय विभागास प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त कार्यालयातील ९,४२३ अस्थायी पदे व नवनिर्मित ५० पदे अशा एकूण ९,४७३ अस्थायी पदांना दि. ०१ मार्च, २०२१ ते दि.३१ ऑगस्ट, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:
या शासन निर्णयान्वये आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त कार्यालयातील अस्तित्वात असलेल्या व खालील नमूद १३ कोष्टकात दर्शविण्यात आलेल्या ९.४२३ अस्थायी पदे व आयुक्तालयाच्या स्तरावरील नवनिर्मित ५० पदे अशा एकूण ९,४७३ अस्थायी पदांना दि.०१ मार्च, २०२१ ते दि.३१ ऑगस्ट, २०२१ पर्यत मुदतवाढ देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
संदर्भित शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी 👉
https://drive.google.com/file/d/136yZvxIC1UQRMudkyhi2Mtajpgk-rS21/view?usp=drivesdk