नाशिक:-कोरोना विषाणू प्रसारातील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासन शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती ही कार्यरत कर्मचा-यांच्या ५० % अशा प्रमाणात दिनांक ३१/३/२०२१ पावेतो नियंत्रीत करण्यात आलेली आहे.परंतू इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी बोर्डाची परिक्षा असल्यामुळे त्यांना यामधून वगळण्यात आलेले आहे. इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षे करीता आपण आपल्यास्तरावरुन तोंडी परिक्षा ,प्रात्याक्षिक परिक्षा व शासनाचे आदेश प्राप्त होताच त्या प्रमाणे सर्व नियमांचे पालन करावे. शासनाचे सूचनांचे पालन करुन इयत्ता १० वी व १२ वी वर्ग सुरु ठेवावेत. त्याचप्रमाणे विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच ऑनलाईन शिक्षण सुरु राहील याकरीता उपलब्ध मनुष्यबळाचे सुयोग्य नियोजन करण्याची जबाबदारी शाळा मुख्याध्यापक यांची राहील.
संदर्भाकीत आदेशात नमूद नुसार आपले अधिनस्त कार्यरत शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांची शाळेत ५० % प्रमाणात उपस्थिती राहील त्या प्रमाणे आपलेस्तरावरुन नियोजन करावे.सदरचे आदेश हे दिनांक ३१/३/२०२१ पावेतोच आहेत.